scorecardresearch

पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि एड्सबाधित रुग्णाचे रक्त; पत्नीला संपवण्याच्या नादात पतीच…

पत्नीवर सतत संशय घेतल्यानंतर पतीने तिला संपवण्यासाठी अघोरी प्रकार केला.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि एड्सबाधित रुग्णाचे रक्त; पत्नीला संपवण्याच्या नादात पतीच…
प्रातिनिधिक छायाचित्र

पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेणाऱ्या पतीने पत्नीला संपविण्यासाठी एक क्रूर शक्कल लढविली. गुजरातमध्ये घडलेल्या या घटनेमुळे तुम्हालाही धक्का बसेल. आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध असल्याचा संशय आल्यानंतर पतीने तिला संपविण्याचा कट रचला. या कटाची स्क्रिप्ट एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे. सगळं नियोजन करुनही या नवऱ्याचा गुन्हा काही लपू शकला नाही. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

गुजरातच्या सूरतमध्ये ही घटना घडलेली आहे. संशयाचा किडा डोक्यात घुसलेल्या एका पतीने एड्सबाधित रुग्णाचे रक्त मिळवले. या रक्ताचे इंजेक्शन त्याने पत्नीला टोचले. इंजेक्शन देताच पत्नी बेशूद्ध झाली. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी पत्नीला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना याबाबतची सूचना दिली. पोलीस रुग्णालयात पोहोचल्यानंतर पत्नीचा जबाब घेऊन त्यांनी चौकशीचे सूत्र फिरवले. पतीची कसून चौकशी केल्यानंतर त्याने एचआयव्हीबाधित एड्स झालेल्या रुग्णाचे रक्त इंजेक्शनमधून बायकोला टोचले असल्याचे मान्य केले.

असं मिळवलं होतं एड्सबाधित रुग्णाचे रक्त

पतीने गुन्हा तर कबूल केला होता. पण त्याने एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णाचे रक्त कसे मिळवले? असा प्रश्न पोलिसांनी विचारला. त्यावर आरोपी पतीने सांगितले की, हे रक्त मिळवण्यासाठी त्याने जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एचआयव्ही वॉर्डला भेट दिली. ज्याठिकाणी एचआयव्ही बाधित रुग्ण होते, तिथे जाऊन एका रुग्णाला त्याने हॉस्पिटलचा कर्मचारी असल्याचे भासविले. जर रुग्णाने त्याला रक्त दिले तर त्याचा आजार दूर करण्यासाठी तो प्रयत्न करेल, अशी थाप रुग्णाला मारली. त्यानंतर त्याचे रक्त घेऊन त्याने पत्नीला इंजेक्शनमधून दिले.

हे ही वाचा >> पत्नीकडून घटस्फोट हवा असल्याने पतीने HIV चं इंजेक्शन आणलं अन्…; धक्कादायक घटनेने पोलीसही चक्रावले

पतीच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित पत्नीने दिलेल्या जबाबानुसार गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्येही सतत भांडणं होत होती. पत्नीवर सतत संशय घेत असल्यामुळे पतीने तिला संपविण्यासाठी हे कारस्थान रचले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 17:32 IST

संबंधित बातम्या