Gujarat School Row : गेल्या काही दिवसांपू्र्वी संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरम्यान गुजरातच्या भावनगर शहरात एका पालिकेच्या शाळेत १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला असाच एक एक कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात आलेल्या नाटकात काही बुरखा घातलेल्या मुलींना ‘दहशतवादी’ दाखवण्यात आल्याने वाद पेटला आहे. यावर मुस्लिम समाजाने आक्षेप घेतल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

भावनगरचे जिल्हा शिक्षण अधिकारी (DEO) हितेंद्रसिंग डी पधेरिया यांनी मंगळवारी भावनगर म्युनिसिपल स्कूल बोर्ड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (AO) मुंजल बदमालिया यांना नोटीस बजावली आहे, ज्यामध्ये त्यांना शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा वस्तुनिष्ठ अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. भावनगर शहरातील कुंभारवाडा भागातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्राथमिक शाळा नंबर ५१ मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ही नोटीस सामाजिक संस्था बांधारन बचाव समिती भावनगरने केलेल्या तक्रारीनंतर जारी करण्यात आली आहे. या संस्थेने आरोप केला आहे की या कार्यक्रमात मुस्लिम समाजाला दहशतवादी दाखवण्यात आले आणि त्यांनी हे नाटक बसवणाऱ्या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी देखील केली.

एओ मुंजाल बादमालिया यांना जारी करण्यात आलेल्या नोटीसीमध्ये शाळेत आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती, याबरोबरच बुरखा घातलेल्या महिलांना दहशतवादी दाखवण्यात आल्याचा प्रकार हा जाणीवपूर्वक होता की नकळत याबद्दल सविस्तर माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

द इंडियन एक्सप्रेसला या घडामोडींबद्दल माहिती देताना पधेरिया म्हणाले की, “सोमवारी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, शाळेत १५ ऑगस्ट रोजी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यकर्मात जाणीवपूर्वक मुस्लिमांना दहशतवादी म्हणून दाखवण्यात आले. सत्य आणि तपशील जाणून घेण्यासाठी मी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरकडे सात दिवसांत खुलासा मागितला आहे.”

ही भावनगर येथील मुलींची शाळा असून यामध्ये ६०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. येथील सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही शाळा सर्वत्र चर्चेत आली आहे. दरम्यान बांधारन बचाव समिती आरोप केला की हा शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून धार्मिक भावना दुखावणे आणि सामाजिक अस्थिरता पसवण्याचा प्रयत्न आहे.

भावनगरच्या कुंभारवाडा भागातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्राथमिक शाळा नंबर ५०-५१ मध्ये मुलांनी एक नाटक सादर केले… या नाटकात काश्मीरी पर्यटक यांच्याबरोबर लष्कर आणि दहशतवादी देखील दाखवण्यात आले होते. या नाटकात मुली या मुस्लिम कपडे (बुरखा) घातलेले दहशतवादी असल्याचे दाखवण्यात आले होते, हे स्पष्टपणे मुस्लिम समाजाला दहशतवादी दाखलण्यात आले, असे बंधारन बचाव समितीने त्यांच्या निवेदनात म्हटले.

समितीने असेही स्पष्ट केले की, या शाळेतील त्या शिक्षकांविरोधात मुस्लिम समाजात संताप व्यक्त केला जात आहे, ज्यांनी अशा प्रकारचे नाटक बसवून त्यांची गुन्हेगारी प्रवृ्त्ती दाखवून दिली.

द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बांधरन बचाव समितीचे अध्यक्ष जेहुरभाई हुस्सेनभाई जेजा म्हणाले की, “मुस्लिम समाजाची मागणी आहे की या कृत्यामागील सर्व शिक्षकांचे निलंबन आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून अशा असंवैधानिक कृत्य भविष्यात होऊ नये.”

अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मुंजाल बदमालिया म्हणाले की, “दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. या वर्षी ऑपरेशन सिंदूर आणि आपल्या संरक्षण दलाचे शौर्य यावर आधारित कार्यक्रम प्रत्येक शाळेत घेण्यात आले. काहीही मुद्दाम किंवा जाणीवपूर्वक नव्हते. आम्ही नोटीसीला आमचे उत्तर देऊ.”

भावनगर शहरातील पालिकेच्य ६८ शाळेत ३०,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या वर्षी ऑपरेशन सिंदूर साजरे करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना राख्या आणि पत्रे हे गुजरातमधील सैनिकांना पाठवले होते. फक्त भावनगर जिल्ह्यातून २ लाखांहून अखि शाळकरी विद्यार्थ्यांनी गुजरातमधील सैनिकांना अशी पत्रे पाठवली होती.