गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना गेल्या काही दिवसात वेग आला आहे. भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १० जणांना कॅबिनेट मंत्रिपद, तर १४ जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी ४.३० वाजता गांधीनगर येथे आयोजित केली आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. निमा आचार्य यांची विधानसभा स्पीकरपदी नियुक्ती झाली आहे. तर राजेंद्र त्रिवेदी यांनी पदाचा राजीनामा देत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील २२ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात माजी उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत कहल समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंत्री

  • राजेंद्र त्रिवेदी
  • जितेंद्र वघानी
  • ऋषिकेश पटेल
  • पूर्णश कुमार मोदी
  • राघव पटेल
  • उदय सिंह चव्हाण
  • मोहनलाल देसाई
  • किरीट राणा
  • गणेश पटेल
  • प्रदीप परमार

राज्यमंत्री

  • हर्ष सांघवी
  • जगदीश ईश्वर
  • बृजेश मेरजा
  • जीतू चौधरी
  • मनीषा वकील
  • मुकेश पटेल
  • निमिषा बेन
  • अरविंद रैयाणी
  • कुबेर ढिंडोर
  • कीर्ति वाघेला
  • गजेंद्र सिंह परमार
  • राघव मकवाणा
  • विनोद मरोडिया
  • देवा भाई मालव

शपथविधी सोहळा बुधवारी दुपारी होणार होता. मात्र नव्या मंत्रिमंडळाबाबत रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज होता. त्यामुळे बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं सुरु होती. त्यानंतर हायकमांडने नाराज नेत्यांची समजूत काढण्याची जबाबदारी रुपाणी यांच्यावर सोडली होती. आज शपथविधी सोहळा पाहता नाराज असलेल्यांना बाहेरचा दाखवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujrat new cabinet tok oath rmt
First published on: 16-09-2021 at 14:32 IST