अयोध्येतील बाबरी मशिद प्रकरणात न्यायालयानं तीन वर्षांपूर्वी ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर देशातील अशाच इतर काही वादग्रस्त प्रकरणांची चर्चा सुरू झाली. वाराणसीमधील ग्यानवापी मशीद प्रकरण देखील त्यातलंच एक. एकीकडे अयोध्येमध्ये वादग्रस्त जागेवर मशीद होती, तर वाराणसीतील ग्यानवापी मशीद परिसरात मशीद आणि मंदिर अशा दोन्ही गोष्टी आहेत. या प्रकरणी मशीद परिसराचं सर्वेक्षण करण्यासाठी वाराणसी न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यासाठी आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अर्थात एएसआयला आदेश दिले होते. मात्र, या प्रकरणातील मुस्लीम पक्ष असणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीनं सर्वेला विरोध केला होता. या पार्श्वभूनमीवर वाराणसीमध्ये दाखल याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली असून आज त्यासंदर्भातला निकाल येण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

वास्तविक या प्रकरणाला १९९१ सालापासूनच सुरुवात झाली होती. भगवान विश्वेश्वर यांच्याकडू वाराणसीच्या न्यायालयात मशीद परिसरात पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीनं अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी थेट २०१९मध्ये मशीद परिसराचा एएसआयकडून सर्वे करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली. अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीनं याहीवेळी सर्वेला विरोध केला. त्यानंतर वाराणसीच्या कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. यासंदर्भात एप्रिल २०२२ मध्ये अर्थात ८ एप्रिल रोजी न्यायालयानं सर्वे करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यासंदर्भात अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीनं आक्षेप घेतला असून त्याबाबतच्या प्रकरणाची सुनावणी आता पूर्ण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अॅडव्होकेट कमिशनर बदलण्याची मागणी

दरम्यान, हा सर्वे करण्यासाठी न्यायालयानं अजय कुमार मिश्रा यांची अॅडव्होकेट कमिशनर म्हणून नियुक्ती केली होती. ते तटस्थपणे काम करत नसल्याची तक्रार करत अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीनं त्यांना बदलण्याची देखील मागणी याचिकेमध्ये केली आहे.