इस्रायलची राजधानी तेल अवीव शहरावर हमासकडून क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर इस्रायलच्या मध्यभागी पुन्हा एकदा सायरनचे आवाज घुमत आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासकडून इस्रायलच्या हद्दीत घुसून हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यानंतर आता अनेक महिन्यांनी हमासने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. हमासने हल्ल्याची जबाबदारी घेतली असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

हमासचे सशस्त्र दल असलेल्या अल-कासम ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी घेतली असून ‘तेल अवीव’वर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डाकली असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायलने शहरात सायरन वाजवून नागरिकांना दक्ष राहण्यास सांगितले आहे. हमासकडून पुन्हा एकदा हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे इस्रायलने खबरदारीचे उपाय योजले आहेत.

Israel-Hamas War: हमासला शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य, इस्रायल-गाझा युद्ध थांबणार?

अल-कासम ब्रिगेडने आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हटले की, झिओनिस्टने (ज्यू नागरिक) मानवतेचा नरसंहार केला. त्यांना आम्ही या हल्ल्यातून चोख उत्तर देत आहोत. हमासच्या अल-अक्सा टीव्हीनेही हा हल्ला गाझापट्टीतून करण्यात आला असल्याचे सांगितले आहे.

गाझाच्या दक्षिणेकडे असलेल्या राफा भागातून आठ क्षेपणास्त्र डागले गेले असल्याचे सांगितले जाते. यापैकी काही क्षेपणास्त्र इस्रायलच्या लष्कराकडून निकामी करण्यात आले, असे वृत्त बीबीसीने दिले आहे. या हल्ल्यात इस्रायलमधील किती नागरिक बळी पडले किंवा किती जणांना दुखापत झाली, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

इस्रायलच्या दक्षिण भागातून गाझापट्टीत मानवी मदतीचे ट्रक आत गेल्यानंतर इस्रायलवर हा हल्ला झाला आहे. गेल्या काही काळापासून राफा सीमेवर बंदी घालण्यात आली होती. मात्र नव्या करारानुसार ही बंदी उठवली गेली. त्यानंतर गाझामध्ये मानवी मदत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. सात महिन्यांहून अधिक काळ इस्रायल आणि हमास यांच्यात गाझापट्टीत संघर्ष सुरू आहे. गाझामध्ये मदत पाठविण्यात यावी, यासाठी इस्रायलवर अनेक देशांचा दबाव होता. गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरू असल्यामुळे गाझात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच तिथे अन्न व इतर जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे.

युद्धखोर कोण? हमास की इस्रायल- हे एकदाचे ठरू द्या!

इस्रायलचा दाव आहे की, त्याना राफामध्ये घुसलेल्या हमासच्या अतिरेक्यांना शोधून संपवायचे आहे आणि त्यांनी ओलीस ठेवलेल्या इस्रायली लोकांना मुक्त करायचे आहे. तथापि लष्करी कारवाईमुळे गाझातील नागरिकांसमोर मोठे संकट कोसळले असून इस्रायलची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडीही झाली.