हरिद्वार द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी दुसरी अटक करण्यात आली आहे. यती नरसिंहानंद गिरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी हरिद्वारला आणले आहे. यापूर्वी वसीम रिझवी उर्फ ​​जितेंद्र त्यागी याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. द्वेषपूर्ण भाषणांमुळे हे प्रकरण खूप चर्चेत आहे. द्वेषयुक्त भाषणांवर कारवाई करण्याचे आवाहनही सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. नागरिक संघटना आणि इतर अनेक व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण आणि इतर व्यक्तींना पत्रेही लिहिली आहेत. हरिद्वार धर्म संसदेत मुस्लिमांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी गुरुवारी पहिली अटक केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. तत्पूर्वी गुरुवारी याच प्रकरणात वसीम रिझवी उर्फ ​​जितेंद्र नारायण त्यागी याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. वसीम रिझवीच्या सुटकेच्या मागणीसाठी यती नरसिंहानंद सर्बानंद घाटावर उपोषण करत होते. याप्रकरणी संतांनी शुक्रवारी सर्वानंद घाटावर निषेध सभाही आयोजित केली होती.

हरिद्वार येथे झालेल्या धर्म संसदेत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी यति नरसिंहानंद यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. या कथित धर्म संसदेत मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण भाषणे देण्यात आल्याचा आरोप आहे.  यती नरसिंहानंद यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी यती नरसिंहानंद यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर २-३ गुन्हे दाखल आहेत. तपास कसा पुढे सरकतो यावर पुढील कारवाई अवलंबून असेल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गाझियाबादमधील डासना मंदिराचे वादग्रस्त महंत नरसिंहानंद यांनी १७-१९ डिसेंबर दरम्यान हरिद्वारमध्ये कार्यक्रम  आयोजित केला होता.

‘धर्म संसद’मध्ये अनेक वक्त्यांनी द्वेषपूर्ण भाषणे दिली होती. या भाषणांवर सोशल मीडियावर बरीच टीकाही झाली होती, त्यानंतर हरिद्वार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र अनेक दिवस उलटूनही कोणावरही कारवाई झाली नाही. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी हाच युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात ठेवत याचिका दाखल केली होती, ज्यावर सर्वोच्च न्यायालयानेही सुनावणी घेण्याचे मान्य केले. त्यानंतर गुरुवारी याप्रकरणी पहिली अटक करण्यात आली. या प्रकरणी जितेंद्र नारायण त्यागी यांच्यासह एकूण १० जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haridwar hate speech case yati narsimhanand giri arrested by uttarakhand police abn
First published on: 16-01-2022 at 08:04 IST