Health Ministry issues advisory on cough syrups among kids : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपच्या संबंधित मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत. यादरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांच्या प्रकरणांमध्ये कफ सिरपच्या वापराबद्दल अॅडव्हायजरी जारी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की दोन वर्षांपेक्षा लहान मुलांना हे औषध दिले जाऊ नये. इतकेच नाही तर पाच वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना देखील डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि योग्य कालावधीसाठीच याचा वापर केला गेला पाहिजे.
आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की खोकला आणि सर्दीच्या प्रकरणात आधी आराम, पुरेसे पाणी आणि इतर सहायक उपाय करणे गरजेचे आहे. सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांनी फक्त गुणवत्तापूर्ण औषधेच द्यावीत आणि राज्य आरोग्य विभागाने हे सर्व सरकारी आणि खाजगी आरोग्य केंद्रात लागू करावे. भारत सरकारने कफ सिरप आणि सर्दी-खोकल्याच्या औषधांचा सुरक्षित आणि तर्कसंगत वापर व्हावा यासाठी नवी अॅडव्हायजरी जारी केली आहे.
भार सरकारने म्हटले आहे की, लहान मुलांच्या बाबतीत कफ सिरप आणि सर्दी-खोकला यांच्या औषधांच्या वापर सुरक्षित आणि तर्कसंगत पद्धतीने झाला पाहिजे. मंत्रालयाने म्हटले की बहुतांश मुलांमध्ये अचानक येणारा खोकला आपोआप बरा होतो आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.
आरोग्य मंत्रालयाच्या अॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की दोन वर्षांहून लहान मुलांना कफ आणि सर्दीचे औषध कदापि दिले जाऊ नये. पाच वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांसाठी ही औषधे सामान्यतः सुरक्षित मानली जात नाहीत.
सिरप देण्याच्या आधी हे उपाय करा
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, पाच वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांसाठी वापर हा फक्त डॉक्टरांच्या देखरेखीखाली, योग्य प्रमाणात आणि मर्यादित काळासाठी केला गेला पाहिजे. याशिवाय यावरही भर देण्यात आला आहे की सर्दी आणि खोकला या आजारांसाठी औषधांएवजी इतर उपाय जसे की पुरेसे पाणी पिणे, आराम करणे आणि इतर सहायक उपाय केले पाहिजेत.
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की सर्व रुग्णालयांनी याची काळजी घ्यावी की चांगली गुणवत्ता असलेली, जीएमपी (Good manufacturing Practice) अंतर्गत तयार केलेल्या औषधांचाच वापर केला जावा आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरचे पालन केले जावे.