पीटीआय, हैदराबाद

तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस सुरूच असल्यामुळे प्रशासनाला दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव ए शांती कुमारी यांनी गुरुवारी सांगितले. मुसळधार पावसामुळे राज्यातील नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. तसेच सखल भागात पूर आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले आहे. भद्रचलम येथे गोदावरी नदीची पातळी ४९.८० फूट इतकी वाढली असून पुराचा दुसरा इशारा देण्यात आला आहे. सखल भागातील लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्याची उपाययोजना केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच मुसळधार पावसामुळे राज्यातील शाळांना शुक्रवापर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक आणि जिल्हा प्रशासन पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. त्याशिवाय राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि अग्निशमन सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच सचिवालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.