पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. हा सोहळा टीव्हीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनीही पाहिला. या संदर्भातले वृत्त एएनआयने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयानंतरही आईची भेट घेत आशीर्वाद घेतले होते. आता ते दिल्लीत शपथविधी घेत असताना तो सोहळाही त्यांच्या आईने टीव्हीवर पाहिला.

निवडणूक होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन आईचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर निवडणूक जिंकल्यावरही त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यात आईचे असलेले स्थान सगळ्या देशाला ठाऊक आहे. आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना तो सोहळा त्यांच्या आई हिराबेन यांनी टीव्हीवरून पाहिला.