पीटीआय, जम्मू

‘‘अनुच्छेद ३७० ही भूतकाळातील गोष्ट आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता पुन्हा कधीही अनुच्छेद ३७० लागू होणार नाही. कारण ते राज्यघटनेचा भाग नाही,’’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगितले. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीनिमित्त शहा यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्या वेळी त्यांनी पुन्हा अनुच्छेद ३७० लागू करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असे सांगितले.

अनुच्छेद ३७० रद्द करणे हे नरेंद्र मोदी सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचे भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. अनुच्छेद ३७० ही तरुणांच्या हातात शस्त्रे आणि दगड देणारी गोष्ट होती. या अनुच्छेदामुळे तरुणांना दहशतवादाकडे वळण्यास भाग पाडले. नॅशनल कॉन्फरन्सचा मूक पाठिंबा आहे. मात्र आम्ही पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० लागू होऊ देणार नाही, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>हाथरसमध्ये बस-मिनी ट्रकच्या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू, तेराव्याच्या कार्याहून येताना घडली दुर्घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जम्मू-काश्मीर हा नेहमीच भारताचा भाग आहे आणि सरकार दहशतवाद आणि फुटीरतावादाशी लढण्यावर भर देत आहे, यावर अमित शहा यांनी जोर दिला. ‘‘२०१४ पर्यंत जम्मू- काश्मीर नेहमीच फुटीरतावाद आणि दहशतवादाच्या छायेत राहिले. या प्रदेशातील आणि प्रदेशाबाहेरील अनेक शक्तींने हा प्रदेश अस्थिर कसा राहील यासाठीच प्रयत्न केले. २०१४ नंतरची १० वर्षे राज्यासाठी सुवर्णकाळ म्हणून ओळखली जातील, असे शहा म्हणाले.जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद आणि फुटीरतावाद नष्ट करण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.

(जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.)