बनावट चकमक प्रकरण आणि कामावर गैरहजर राहणा-या दोन महिला आयपीएस अधिका-यांवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कारवाई केली आहे. उत्तराखंड कॅडरच्या आयपीएस अधिकारी ज्योती बेलूर आणि १९९१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी मेरी लूई फर्नांडीस या दोघांना गृहमंत्रालयाने बडतर्फ केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील भोजपूमधील बनावट चकमक प्रकरणात ज्योती बेलूर या आरोपी आहे. १९९६ मध्ये झालेल्या या चकमकीत पोलिसांनी ४ गुन्हेगारांना ठार मारल्याचा दावा केला होता. मात्र सीबीआय चौकशीमध्ये पोलिसांचा दावा खोटा होता असा खुलासा झाला. या बनावट चकमकीत पोलिसांनी मारलेल्या जसवीर या तरुणाच्या शरीरातून गोळी बाहेर काढण्यात आली होती. ही गोळी वेलूर यांच्या बंदुकीतून चालवण्यात आल्याचे समोर आले होते. न्यायालयाने या प्रकरणातील दोषी पोलिसांना बुधवारीच शिक्षा सुनावली आहे. तर वेलूर या अजूनही फरार असून त्यांच्या शोधासाठी सीबीआयने विशेष पथक तयार करावे असे निर्देश न्यायालयाने दिले होते. पोलीस पदक मिळवण्यासाठी पोलिसांनी चकमकीचा बनाव रचला होता. या प्रकरणात पोलिसांवर चार निर्दोष व्यक्तींची हत्या केल्याचा आरोप होता. पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस निरीक्षक आणि चार पोलिसांसह आयपीएस अधिकारी ज्योती बेलूरचा आरोपींमध्ये समावेश होता. बेलूर सध्या देशाबाहेर असून त्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असल्याचे समजते. ब्रिटनमध्ये त्या सध्या एका पुस्तकाचे लिखाण करत असल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home ministry sacked two women ips officer over fake encounter and unauthorised leave
First published on: 22-02-2017 at 20:32 IST