वृत्तसंस्था, नवी दिल्ली

विविध मतदानोत्तर चाचण्यांमधून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवले जात आहेत. बहुतेक सर्व विश्लेषकांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला घसघशीत बहुमत दर्शवले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी निरनिराळ्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये काय अंदाज व्यक्त करण्यात आले होते आणि प्रत्यक्षात काय निकाल लागला याचा आढावा घेतला असता, अचूक अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यांचा ताळमेळ लागला नव्हता. मात्र, रालोआचा विजय होईल हा अंदाज सर्वांनी अचूकरित्या वर्तवला होता.

‘इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया’ यांनी रालोआला ३३९ ते ३६५ तर यूपीएला ७७ ते १०८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यांनी सर्व मतदारसंघांमध्ये जवळपासस ८ लाख लोकांमध्ये सर्वेक्षण केले होते. न्यूज टुडे-टुडेज चाणक्य यांनी एनडीएला ३५० जागा मिळतील असे सांगितले होते. तर रालोआला ९५ जागा मिळतील असे सांगितले होते. ‘न्यूज१८-आयपीएसओएस’ने रालोआला ३३६ तर यूपीएला ८२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता.

हेही वाचा >>>“पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा करून सूर्याला शांत केलं, त्यामुळे आता…”, खासदार रवी किशन यांचं वक्तव्य

‘टाइम्स नाऊ-व्हीएमआर’ यांनी रालोआला ३०६ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. तर यूपीए १३२ जागांवर विजय मिळवेल असे त्यांनी सांगितले होते. या अंदाजात ३ टक्के त्रूट राहू शकते असेही त्यांनी स्पष्ट केले होते. ‘इंडिया टीव्ही-सीएनएक्स’ने रालोआला ३०० जागा आणि यूपीएला १२० जागा अशी आकडेवारी सांगितली होती. ‘एबीपी-सीएसडीएस’ यांनी रालोआला २७७ आणि यूपीएला १३० जागा मिळू शकतील असा अंदाज व्यक्त केला होता. ‘इंडिया न्यूज-पोलस्ट्रॅट’ यांनी रालोआला २८७ तर यूपीएला १२८ जागा मिळतील असे सांगितले. ‘सी व्होटर’ने रालोआला २८७, यूपीएला १२८ जागांचा अंदाज व्यक्त केला होता.

प्रत्यक्ष रालोआला ३५३ जागा मिळाल्या. त्यापैकी एकट्या भाजपने ३०३ जागा मिळवल्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला ९१ जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसची कामगिरी किंचित सुधारून ५२ जागा मिळाल्या होत्या.

२०१९ चा अंदाज

संस्था रालोआ यूपीए

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया ३३९ ते ३६५ ७७ ते १०८

न्यूज टुडे-टुडेज ३५० ९५

न्यूज१८-आयपीएसओएस ३३६ ८२

टाइम्स नाऊ-व्हीएमआर ३०६ १३२

इंडिया टीव्ही-सीएनएक्स ३०० १२०

एबीपी-सीएसडीएस २७७ १३०

इंडिया न्यूज-पोलस्ट्रॅट २८७ १२८

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सी व्होटर २८७ १२८