PMJAY Scheme Application Process : एखादा मोठा आजार होणं, प्रवासात अपघात होणं, वयोमानुसार एखादी दुखापत झाल्यावर मन आपसूकच खचून जातं. अशावेळी भावनिक आणि आर्थिक खड्डा आपल्या आयुष्यात पडतो. कुटुंबातील सदस्यांकडे मदत, एखाद्याकडे पैसे मागायला जावं तरी कसं हेही अनेकदा मनात येतं. त्यामुळे काही मंडळी हेल्थ इन्शुरन्स किंवा लोकप्रिय भाषेत मेडिक्लेमसुद्धा घेऊन ठेवतात. पण, हा खर्च आपल्या खिशातून करावा लागला नाही तर आणखीन बरं होईल ना… कदाचित हेच लक्षात घेऊन केंद्र शासनाने २०१८ पासून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ सुरू केली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा ७० वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना‘ राबविली जाते. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी पात्रता २०११ च्या सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना (एसईसीसी-२०११) मधील डेटाच्या आधारे निश्चित केली जाते. त्यासाठी ग्रामीण आणि शहरी कुटुंबांसाठी निकष लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार तुम्ही पात्र आहात का हे तपासून तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकता.
आयुष्मान भारत योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का हे ऑनलाइन कसे तपासायचे? (How To Check Eligibility for Ayushman Bharat Yojana)
- आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा
- होमपेजवरील ‘Am I Eligible’ या सेक्शनमध्ये प्रवेश करा.
- पुढील पेजवर तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
- नंतर ‘ओटीपी जनरेट करा’ बटणावर क्लिक करा.
- तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी तिथे टाका आणि ‘Verify OTP’ या बटणावर क्लिक करा.
- पुढील पेजवर नाव, राज्य, वय, कुटुंबातील सदस्य आणि उत्पन्नाचा तपशील यांसारखी आवश्यक माहिती भरून घ्या.
- सर्व माहिती लिहिल्यानंतर सबमिट करा’ या बटणावर क्लिक करा.
आयुष्मान कार्डसाठी अर्ज कसा करायचा? (Application Process for Ayushman Bharat Card)
जर तुम्हाला आयुष्मान कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट द्या. आयुष्मान कार्डसाठी आवश्यक माहितीसह ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
आयुष्मान कार्ड ऑनलाइन कसं काढायचं? ( How To Apply Ayushman Bharat Card Online )
- तुमच्या डिव्हाइसवरील कोणत्याही ब्राउझरचा वापर करून आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइट http://www.pmjay.gov.in ला भेट द्या.
- होमपेजवर, योजनेसाठी तुमची पात्रता तपासण्यासाठी ‘‘Am I Eligible’ या टॅबवर क्लिक करा.
- तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा, नंतर पुढे जाण्यासाठी ‘ओटीपी जनरेट करा’ वर क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला ओटीपी तिथे लिहून लॉग इन करण्यासाठी ‘Verify OTP’ वर क्लिक करा.
- तुमचे नाव, राज्य, वय, उत्पन्न आणि कुटुंब माहिती यासारखी आवश्यक वैयक्तिक माहिती द्या.
- सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरल्यानंतर पुढे जाण्यासाठी ‘सबमिट करा’ बटणावर क्लिक करा.
- आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तुमची पात्रता स्थिती स्क्रीनवर दर्शविली जाईल.
- तुमच्या प्रोफाइलशी लिंक केलेली माहिती पाहण्यासाठी ‘Family Members’ टॅबवर क्लिक करा.
- एकदा पात्र झाल्यानंतर तुम्ही आरोग्य लाभ मिळविण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करू शकता.
आयुष्मान कार्ड ऑफलाइन कसं काढावं? ( How To Apply Ayushman Bharat Card Offline )
जर तुम्हाला कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा पॅनेल केलेल्या रुग्णालयात जाऊन आयुष्मान भारत कार्डसाठी ऑफलाइन अर्ज करू शकता. फक्त तुमचे आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुमच्या बरोबर ठेवा.
आयुष्मान कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे… (What Documents Are Required For Ayushman card)
- बायोमेट्रिक आणि ओळख पडताळणीसाठी आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्न पात्रतेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- तुम्हाला संपर्क करता येईल अशी माहिती जसे की, मोबाइल, पत्ता आणि ईमेल आयडी.
- ऑनलाइन आयुष्मान कार्ड काढताना ही कागदपत्रे आवश्यक असतात.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्डमध्ये तुमचे नाव कसे जोडायचे? (How To Add Your Name To Ayushman Card Under The Ayushman Bharat Yojana)
- जर तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव जोडायचे असेल तर ‘Add Family Details’ हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमचा रेशन कार्ड क्रमांक तिथे लिहा, नंतर ‘Check Document Details’ वर क्लिक करा.
- जर रेशन कार्ड आधीच कुटुंबाशी जोडलेले असेल, तर सिस्टमखाली एक मेसेज लिहिलेला दिसेल.
आयुष्मान कार्ड ऑनलाइन कसे डाउनलोड करायचे? (How To Download Ayushman Card Online)
- आयुष्मान भारत योजनेच्या https://www.pmjay.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर, वरच्या मेनूमध्ये ‘Am I Eligible’ हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- तुमच्या आयुष्मान भारत खात्याशी लिंक केलेला तुमचा मोबाइल नंबर एंटर करा.
- जर तुमचे नाव लाभार्थी यादीत असेल, तर तुम्हाला तुमच्या खात्याशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी मिळेल. तुमची ओळख पटवण्यासाठी ओटीपी एंटर करा.
- एकदा तुमची ओळख पटली की, तुम्ही आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करू शकता.
- स्क्रीनवर दिलेल्या ‘कार्ड डाउनलोड करा’ पर्यायावर क्लिक करा.
- तुमचे आयुष्मान भारत कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होऊन येईल.
- भविष्यात वापरण्यासाठी कार्डचे प्रिंटआउट घ्या आणि वैद्यकीय उपचार घेण्यासाठी बरोबर घेऊन जा.
आयुष्मान कार्ड ऑफलाईन कसं डाउनलोड करायचं? (Offline Process To Download Ayushman Card)
आयुष्मान भारत कार्ड ऑनलाइन डाउनलोड करताना तुम्हाला काही समस्या आल्यास, तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs) द्वारे आयुष्मान भारत कार्ड ऑफलाइन डाउनलोड करू शकता.
- जवळच्या कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSC) केंद्राला भेट द्या.
- एकदा का तुम्ही CAP सेंटरवर पोहोचलात, की तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पडताळणीसाठी द्यावा लागेल.
- तुमची ओळख पटल्यानंतर, तुम्हाला नोंदणीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील.
- CSC मधील अधिकृत व्यक्ती तुमची माहिती पडताळून पाहेल आणि आयुष्मान भारत कार्ड जारी करेल.
- काही दिवसांनी CSC केंद्रातून तुम्ही आयुष्यमान कार्ड घेऊ शकता.