बांगलादेशमधील चितगॉंग येथे एका शिपिंग केंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला असून साधारण ४५० जण जखमी झाले आहेत. ४ जून रोजी रात्री ही भीषण आग लागली होती. या घटनेत पाच अग्निशमन दलाचे जवानदेखील मृत्युमुखी पडले असून अजूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही.

हेही वाचा >> “स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवू शकले नाही आणि…”; बृजभूषण सिंह यांची राज ठाकरेंवर टीका

मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशमधील चितगॉंग मधील शितकुंडा येथे एका शिपिंग कंटेनरच्या डेपोला भीषण आग लागली. या आगीमध्ये आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून ४५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >> “लोक स्वत:शीच लग्न करु लागली तर हिंदूंची लोकसंख्या कमी होईल”; भाजपा आमदाराचा ‘सोलोगॅमी’ला विरोध

एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार “या आगीत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अग्निशामक दलाच्या पाच जवानांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीवर अजूनही पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही,” अशी माहिती बांगलादेश आरोग्य विभागाचे संचालक हसन शहरयार यांनी दिली.

हेही वाचा >> इम्रान खान यांच्या हत्येचा कट? पाकिस्तानमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्तगॉंग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात नियुक्त करण्यात आलेले पोलीस अधिकारी नुरुल अलाम यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे लागली असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. तसेच रात्री साधारण ९ वाजता ही आग लागली होती. त्यानंतर येथे मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे आग पसरली असं सांगण्यात येतंय. या घटनेची नंतर सखोल चौकशी केली जाणार आहे.