‘प्लेबॉय’ या जगप्रसिद्ध मासिकाचे जनक ह्यू हेफनर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. प्लेबॉय एन्टरप्रायजेसकडून पत्रक प्रसिद्ध करून हेफनर यांच्या मृत्यूबद्दलची माहिती देण्यात आली. १९५३ मध्ये ह्यूज हेफनर यांनी ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात केली. मासिकातील नग्न छायाचित्रे, अतिधीट विषयांवरील चर्चा आणि मुलाखती यामुळे साहित्य विश्वात मोठे वादळ निर्माण झाले. मात्र, त्यानंतर तब्बल दोन दशके हे मासिक साहित्यिक विश्वात कायम चर्चेचा विषय राहिले. साहित्य, समाज आणि पारंपरिक अमेरिकी विचारधारा यांच्यावर बंडखोरीतून आसूड ओढत असतानाही केवळ अनावृत ललनांच्या दिलखूश छायाचित्रांच्या माऱ्यामुळे प्लेबॉय मासिकाचा १९५३ सालापासून जगभर प्रसार झाला. जागतिकीकरणाआधी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या गोष्टींपैकी एक म्हणून या मासिकाची नोंद केली जाते. याशिवाय, ह्यू हेफनर अमेरिकेतील व्यक्तीस्वातंत्र्याच्या चळवळीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. अमेरिकेतील टपाल विभागाने ‘प्लेबॉय’ मासिक घरपोच देण्यास नकार दिल्यानंतर ह्यू हेफनर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘प्लेबॉय’चे साहित्यिक गोमटेपण

अनावृत शरीर छब्यांसोबत वैचारिक आणि साहित्यिक मेजवानीचा झरा प्लेबॉयने कधी आटू दिला नाही. १९८० नंतर बदलत जाणाऱ्या स्पर्धेचा, इंटरनेटचा आणि नियतकालिक वाचनाच्या घटत्या ओघाचा फटका प्लेबॉयला बसला. आज इंटरनेट आणि समांतररीत्या हॉलिवूडला झाकोळण्याची ताकद निर्माण झालेल्या पोर्न विश्वाने स्त्री नग्नतेची व्याख्या बदलून टाकली आहे. या धर्तीवर आपल्या मासिकाचे एकेकाळी असलेले खपमूल्य झुगारून देऊन ‘प्लेबॉय’ने २०१५ मध्ये आपल्या पानांवरून स्त्री-शरीराची दिगंबरावस्था दाखवणार नसल्याचे या महिन्यात जाहीर केले. या माध्यमातून मासिकाला कौटुंबिक स्वरूप देण्याचा आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्लेबॉय सोज्वळ झाला कुणी नाही पाहिला?

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hugh hefner iconic founder of playboy has died at age
First published on: 28-09-2017 at 09:50 IST