सध्या समोर येणाऱ्या हत्येच्या घटना या भयंकर आहेत. काही दिवसांपूर्वीच श्रद्धा वालकर प्रकरण समोर आलं होतं ज्यामध्ये लिव्ह इन पार्टनर आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. यासारखीच आणखी एक घटना समोर आली आहे. जी घटना म्हणजे क्रौर्याचा कळस आहे. एका २२ वर्षीय तरूणाने आपल्या गर्लफ्रेंडला मेसेज केला आणि बोलला म्हणून दुसऱ्या मित्राचा गळा चिरला. हा तरूण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मृतदेहाचा प्रायव्हेट पार्ट कापला, त्याचं हृदयही बाहेर काढलं. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

काय आणि कुठे घडली घटना?

आरोपीने कथित माहितीप्रमाणे आपल्याच मित्राचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याचं शीर धडावेगळं केलं. त्यानंतर त्याची बोटं कापली, प्रायव्हेट पार्टही कापला आणि हृदयही बाहेर काढला. २२ वर्षीय तरूणाने हे कृत्य करून क्रौर्याचा कळस गाठला आहे. हैदराबाद या ठिकाणी ही घटना घडली आहे. या आरोपीच्या गर्लफ्रेंडचे त्याच्या मित्राशी पूर्वसंबंध होते. त्यानंतर एक दिवस त्याने तिला मेसेज केला आणि तिच्याशी संवाद साधला म्हणून मित्राने मित्राची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केली. पोलिसांनी पीडित तरूणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या मृतदेहाची तपासणी करण्यासाठी तो सरकारी रूग्णालयात पाठवला आहे. तसंच पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करत यासंबंधीची कारवाई सुरू केली आहे. नवीन असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी हरिहर कृष्ण या तरूणाला अटक केली आहे. ANI ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. तिचं ब्रेक अप झाल्यानंतर तिचे संबंध हरिहर कृष्ण या कॉलेजमधल्या मुलाशी संबंध जुळले. नवीनने सर्वात आधी या तरूणीला प्रपोज केलं होतं पण त्यानंतर या दोघांचं ब्रेक अप झालं. त्यानंतर हरिहर कृष्णसोबत तिचे संबंध होते.

ब्रेक अपनंतरही तरूण होता तरूणीच्या संपर्कात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रेकअप झाल्यानंतरही जो तरूण तरूणीला भेटत होता. तिला मेसेज आणि फोन करत होता. नवीन तिला फोन आणि मेसेज करत होता जे हरिहर कृष्णला आवडलं नव्हतं. त्यामुळे त्याने नवीनची हत्या केली.

नवीन ब्रेक अपनंतरही मुलीला फोन करत होता

नवीन ब्रेक अपनंतरही या मुलीला फोन करत होता. १७ फेब्रुवारीला दोघांमध्ये मारामारी झाली होती. त्यानंतर हरिहर कृष्ण याने गळा दाबून नवीनची हत्या केली. नवीनच्या मृतदेहासोबत अत्यंत क्रूर प्रकार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने खून करून शरीराचे तुकडे केले आणि प्रायव्हेट पार्ट आणि हृदय बाहेर काढले. त्याने त्याचे बोटेही कापली. हे सर्व केल्यानंतर आरोपीने फोटो काढून प्रेयसीला पाठवला. यानंतर त्याने पोलिसात जाऊन आत्मसमर्पण केले. आरोपीने पोलिसात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. झालेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपीच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला आहे.