Hyderabad school’s annual nursery fee of Rs 2.5 lakh sparks debate : हैदराबाद येथील एका खाजगी शाळेत आकारल्या जाणाऱ्या फी संबंधित एक कागद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये नर्सरीची वार्षिक फी २,५१,००० रुपये असल्याचे दिसून येथ आहे. धर्म पार्टी ऑफ इंडियाच्या संस्थापक अनुराधा तिवीर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एख्सवर यासंबंधी एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे भारतातील मध्यम वर्गातील एखाद्या कुटुंबाला त्यांच्या मुलांना हे शिक्षण देणे परवडू शकते का? याबद्दल सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे.

“आता एबीसीडी शिकण्यासाठी तुम्हाला दरमहा २१,००० रुपये खर्च येईल. इतक्या हास्यास्पदरीत्या जास्त फीला न्याय देण्यासाठी या शाळा असं काय शिकवत आहेत,” असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीले आहे.

फोटोमध्ये दिसत असलेल्या या शाळेच्या फीच्या स्ट्रक्चरनुसार , प्री-प्रायमरी I आणि IIची वार्षिक फी ही २,४२,७०० रुपये आहे. तर इयत्ता पहिली आणि दुसरीची फी वार्षिक २,९१,४६० रुपये आहे.

या पोस्टवर सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतक्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात फी आकारण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर काही वापरकर्त्यानी अशा शाळांमध्ये मुलांना घालणे टाळावे असे म्हटले आहे.

“जर कोणी फी भरू शकत नसेल तर तुमच्या मुलांना या शाळेत पाठवू नका. साधे आणि सरळ आहे,” असे एका वापरकर्त्याने म्हटले. “ही संपूर्ण प्रक्रिया एक प्रकारचा स्कॅम बनली आहे. काही गोष्टींवर प्रभावीपणे नियंत्रित आणण्याची आवश्यकता आहे,” असे दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले आहे. दरम्यान या शाळेकडून या ऑनलाईन टीकेला अद्याप कुठलेही उत्तर देण्यात आलेले नाही.एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

कॉईनस्वीच आणि लेमोनचे सह-संस्थापक आशिष सिंघल यांनी प्रायमरी वर्गांसाठी शाळा वाढवत असलेल्या फीच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. त्यांनी एका रिपोर्टचा दाखला देत नमूद केले होते की या फी मध्यम वर्गाच्या उत्पन्न वाढीला मागे टाकत दरवर्षी १० ते ३० टक्क्यांनी वाढत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये, सिंघल यांनी दावा केला आहे की शाळेचा खर्च हा आता घरातील उत्पन्नाच्या जवळपास १९ टक्क्यांपर्यंत जातोआणि पालक किंडरगार्डनची फी भरण्यासाठी ईएमआय करत आहेत.