“भारत आपल्या संस्कृती आणि सांस्कृतिक वारशामुळे जगभरात सर्वोत्तम आहे. आपली कला, संस्कृती आणि कलाकार हा त्याचा आधार आहे. ज्या कोणत्या देशाने आपल्या कलाकारांची उपेक्षा केली आहे, तिथे फक्त घसरण झाली आहे. कला क्षेत्र आणि कलाकार समस्यांना तोंड देत आहेत. एक कलाकार म्हणून मला त्यांची काळजी वाटते.” असं भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी आज लोकसभेत म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच, “आमच्या लोककला आणि शास्त्रीय कलाकार आणि इतर कलाकारांची ओळख धोक्यात आहे. साथीच्या रोगामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे आणि आपली कला सोडून उदरनिर्वाहासाठी वेगळ्या नोकऱ्या करण्यास भाग पाडले आहे. या कलाकारांच्या आर्थिक मदत आणि पेन्शनची व्यवस्था करावी अशी माझी सरकारकडे मागणी आहे.” असंही हेमा मालिनी यांनी म्हटलं.

याचबरोबर, “२०१७ मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने कला आणि कलाकारांबद्दल माहिती संकलित करण्यासाठी राष्ट्रीय सांस्कृतिक मानचित्रण योजना सुरू केली. ताज्या माहितीनुसार, संसाधनांच्या कमतरतेमुळे ही बंद करण्यात आली आहे. मी सरकारला विनंती करतो की ही योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून द्यावीत.” अशी मागणी देखील हेमामालिनी यांनी यावेळी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I demand the govt to make arrangements for financial aid and pension of these artists hema malini msr
First published on: 16-03-2022 at 15:41 IST