महत्वकांक्षा बाळगण्यात चूक काय असा प्रश्न विचारत काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी राजस्थान नाट्यावर भाष्य केलं आहे. आणखी एक सहकारी आज पक्ष सोडून गेला. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे हे दोघेही खूप चांगले सहकारी आणि चांगले मित्र होते. काँग्रेस पक्ष या दोघांनीही सोडला. या दोघांमध्येही काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. महत्वाकांक्षा बाळगण्यात चूक काहीही नाही. या दोघांनीही पक्ष कठीण काळात असताना खूप चांगलं काम केलं आहे असंही प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे.

राजस्थानात सचिन पायलट यांनी गेहलोत सरकारविरोधात बंडाचा झेंडा उभारला. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी ज्योतिरादित्य शिंदेंसोबत घेतलेली भेट आणि त्यानंतर राजस्थानात वेगाने घडलेल्या घडामोडी महत्त्वाच्या ठरल्या. दरम्यान काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं आहे. तसंच त्यांनी काँग्रेसही सोडलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेले. तर आता सचिन पायलट यांनीही काँग्रेस सोडलं आहे. त्यामुळे प्रिया दत्त यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दोन चांगले नेते काँग्रेस सोडून गेले आहेत. महत्वाकांक्षा असणं काहीही चुकीचं नाही अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.