राहुल गांधी यांच्या १४५ दिवसांपासून सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला. श्रीनगरमध्ये काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकावून त्यांनी या यात्रेची सांगता केली. या कार्यक्रमावेळी त्यांनी भाषण देखील केलं. या भाषणात त्यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे स्वतःचं घर नाही. राहुल गांधी म्हणाले, “माझ्याकडे स्वतःचं घर नाही. मी लहानपणापासून सरकारी घरांमध्ये राहिलो आणि वाढलो आहे. माझ्यासाठी घर म्हणजे एक विचार आहे, जगण्याची आणि विचार करण्याची एक पद्धत आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी म्हणाले की, “मी काश्मीरला येत असताना जेव्हा खालून वर चढत येत होतो. तेव्हा मी विचार केला, माझे पूर्वज देखील याच रस्त्याने वरून खाली (काश्मीरवरून) आले असतील. माझे पूर्वज काश्मीरवरून अलाहाबादला गंगा किनारी येऊन राहिले. मला इथे येताना असं वाटत होतं की, मी माझ्या घरी जातोय. लहानपणापासून मी सरकारी घरांमध्ये राहिलो आहे, जी माझ्यासाठी एक इमारत असते.”

“कश्मिरियतचा विचार माझ्या पूर्वजांनी इथूनच नेला”

राहुल गांधी म्हणाले की, “घर म्हणजे माझ्यासाठी एक विचार आहे, जगण्याची आणि विचार करण्याची पद्धत आहे. तुम्ही ज्याला कश्मिरियत म्हणता मी त्याला घर म्हणतो. कश्मिरियत काय आहे माहितीय का? हा देखील एक विचार आहे. हा विचार भगवान शिवाने दिला आहे. ज्याला शून्यता म्हणता येईल. म्हणजेच स्वतःवर, स्वतःच्या विचारांवर, आपल्यामधील अहंकारावर आक्रमण करणे. तर दुसऱ्या बाजुला इस्लाममध्ये यालाच आपण ‘फना’ म्हणतो. फना म्हणजे स्वतःवर आणि आपल्या अहंकारावर आक्रमण करणे, आपला जो मी पणाचा किल्ला आहे त्यावर आक्रमण करणे. भगवान शिव आणि इस्लाममधील विचाराचं हे एक नातं आहे. यालाच आपण काश्मिरियत म्हणतो. म्हणजेच इतरांवर आक्रमण करू नये.”

हे ही वाचा >> भारत जोडो समारोप यात्रेत प्रियांका गांधी यांचे जोरदार भाषण; म्हणाल्या, “भारत जोडो यात्रेने देशाला…”

काय आहे गंगा-जमुना तहजीब?

राहुल गांधी म्हणाले की, “माझे पूर्वज काश्मीरहून अलाहाबादला गंगा किनारी जाऊन वसले. जाताना त्यांनी ‘कश्मिरियत’ सोबत नेली. म्हणजेच हा विचार सोबत नेला. कश्मिरियतचा विचार त्यांनी गंगेत अर्पण केला. हा विचार उत्तर प्रदेशात पसरला. त्यालाच लोक ‘गंगा जमुना तहजीब’ म्हणू लागले.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I dont have my own house for me home is a thought says rahul gandhi asc
First published on: 30-01-2023 at 14:15 IST