युपीएससी टॉपर टीना डाबी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत. टीना डाबी २०१६ राजस्थान कॅडरच्या अधिकारी असून २०१३ मधील बॅचचे आयएएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत लवकरच लग्न करण्याच्या तयारीत आहे. टीना डाबी यांनी इन्स्टाग्रामवर प्रदीप गावंडे यांच्यासोबत फोटो शेअर करत यासंबंधी खुलासा केला आहे.

टीना डाबी यांनी इन्स्टाग्रामला फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, “तू दिलेलं हास्य मी परिधान करत आहे”.

प्रदीप गावंडे यांनीदेखील इन्स्टाग्रामला टीना डाबी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या हात हातात घेऊन बसलेले दिसत आहेत.

टीना डाबी यांचं हे दुसरं लग्न –

टीना डाबी यांनी याआधी २०१८ चे आयएएस अतहर खान यांच्यासोबत लग्न केलं होतं. दोन वर्षांनी २०२० मध्ये त्यांनी सहमतीने तलाक घेतला होता. अतहर खान २०१६ युपीएससी परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाचे टॉपर होते. ट्रेनिंगदरम्यान टीना आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. २०१८ मध्ये त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. लग्नानंतर अतहर खान राजस्थानमध्ये कार्यरत होते. पण तलाक झाल्यानंतर त्यांनी जम्मू काश्मीर कॅडर घेतलं आणि आपल्या राज्यात गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीना डाबी मूळच्या दिल्लीच्या आहेत. गेल्यावर्षी त्यांची बहिण रिया डाबीने पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. रिया सर्वात कमी वयात युपीएससी उत्तीर्ण करणाऱ्यांपैकी एक ठरली होती. २३ व्या वर्षातच तिने परीक्षा उत्तीर्ण केली.