भारतात एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. भारतातील विविध भागात एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. यंदा उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका मध्य भारताला बसण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातही उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा ‘आयएमडी’कडून देण्यात आला आहे.

कोणत्या भागात सर्वाधिक उष्णता वाढणार?

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या दरम्यान गुजरात, आंध्रप्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमालचल प्रदेश, महाराष्ट्र, बंगाल या राज्यासह आदी भागांमध्ये सर्वाधिक उष्णता असणार आहे. याबरोबरच समुद्रकिनारी असलेल्या भागालादेखील उष्णतेचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

loksatta analysis causes of forest fires in uttarakhand
विश्लेषण : उत्तराखंडमधील वणवा आटोक्यात का येत नाही? वणव्यांची समस्या जगभर उग्र का बनतेय?
Mumbai Monsoon Alert , High Waves of Over 4.5 Meters, High Waves Expected on 22 Days, 20 september to See Highest Wave, high tides in Mumbai, Mumbai monsoon, Mumbai high tides 22 days,
मुंबई : यंदा पावसाळ्यात २२ वेळा ४.५ मीटर उंचीच्या लाटा उसळणार
adani electricity Increase fuel surcharge for may
अदानीची वीज महागली; मे महिन्यापासून इंधन अधिभारात वाढ
More than average rainfall this year Know the weather forecast of monsoon rains
Monsoon Season Update : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस… जाणून घ्या मोसमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

हेही वाचा : Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…

मे महिन्यात चार अंशानी तापमान वाढणार?

मार्च महिन्यात ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्यात एक किंवा दोन अंश सेल्सिअस तापमान कमी जास्त झाल्याची नोंद झाली. मात्र, एप्रिलमध्ये या तापमानामध्ये दोन किंवा तीन अंशाने वाढ होणार आहे. तसेच हे तापमान वाढून एप्रिल महिन्यात ४२ अंश आणि मे महिन्यात तापमानामध्ये आणखी वाढ होऊन ४४ अंशापर्यंत जाऊ शकते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

उष्णतेची लाट दहा दिवस राहणार?

एक ते तीन दिवसांच्या तुलनेत या वर्षी उष्णतेची लाट आठ दिवस राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, भारतात एप्रिल-मे महिन्यात सूर्य आणखी तापणार असल्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.