गुजरातच्या वडोदरामध्ये एका शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे. मधल्या सुट्टीत मुलं जेवण करत असताना अचानक वर्गाची भिंत कोसळली. त्यामुळे सहा विद्यार्थी बेंचसह पहिल्या माळ्यावरून १० फूट खाली पडले. या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओदेखील आता समोर आला आहे.

सहा विद्यार्थी जखमी

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वडोदरा शहरातील नारायण विद्यालयात ही घटना घडली. या शाळेत पहिल्या माळ्यावरील एका वर्गात मुलं मध्यल्या सुट्टीत जेवण करत होती. त्यावेळी अचानक वर्गाची भिंत कोसळली. या घटनेत सहा विद्यार्थी बेंचसह १० फूट खाली पडले. यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा – प्रेम कमी झालं म्हणून सहमतीचे शारीरिक संबंध बलात्कार ठरत नाहीत : उच्च न्यायालय…

विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

ही घटना घडताच शाळा प्रशासनाने या घटनेची माहिती अग्नीशमन दलाला दिली. अग्नीशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू केले. तसेच जखमी विद्यार्थांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले.

हेही वाचा – Budget 2024: रेल्वेचा अर्थसंकल्प पूर्वी वेगळा का मांडला जात होता? ९४ वर्षांची परंपरा का आली संपुष्टात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळेची इमारत जीर्ण असल्याचा दावा

दरम्यान, प्राथमिक तपासात समोर शाळेची इमारत अतिशय जीर्ण अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. तसेच शाळा प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व प्रमाणपत्रे आणि कागतपत्रे असल्याचा दावा केला जातो आहे.