scorecardresearch

भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील : असदुद्दीन ओवेसी

भारतीय राजकारणात मुस्लिमांचे मत आता एवढे महत्वाचे राहिलेले नाही, असंही म्हणाले आहेत.

भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील : असदुद्दीन ओवेसी

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन (एमआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज (सोमवार) एका जाहीर सभेत बोलताना एक खळबळजनक विधान केल्याचं समोर आलं. भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील. असं ओवेसींनी म्हटलं आहे.

जाहीर सभेत बोलताना ओवेसी म्हणाले, “ २०१४ ची लोकसभा निवडणूक झाली, एमआयएम लढली नाही तरी पण मग भाजपा कशी काय जिंकली. २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. एमआयएम २५-२७ जागांवर आणि भाजपा ३०० जागांवर यशस्वी झाली. कोण जबाबदार? त्यानंतर २०१९ ची लोकसभा निवडणूक झाली. तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये एमआयएम लढली नाही. सपा आणि बसपा एकत्र लढले, केवळ १५ जागांवर यश मिळवलं. मग सांगा त्या सगळ्या जागांवर भाजपा कशी काय जिंकली?”

तसेच, “ माझ्या मित्रांनो भारतीय राजकारणात तुमचे एवढे महत्व राहिलेले नाही. तुमच्या मताचे, मुस्लिमांच्या मताचे आता एवढे महत्व राहिलेले नाही. आपल्या डोळ्यात नेहमीच धुळफेक करण्यात आली की, मुसलमान एक व्होट बँक आहे. मी संसदेत उभा राहून ही गोष्ट सांगितली होती की, भारतात मस्लीम व्होट बँक राहणार नाही. भारतात नेहमीच हिंदू व्होट बँक होती, आहे आणि राहील.” असं यावेळी ओवेसींनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “ जर कुणी विचारलं की तुम्ही असं कसं काय म्हणत आहात? व्होट बँकेचे राजकारण, व्होट बँकेचे राजकारण…नेहमी बोललं जातं की मुस्लीम व्होट, मुस्लीम व्होट कुठंय मुस्लीम व्होट? जर मुस्लीम मतं असती तर भारताच्या संसदेत केवळ २३-२४ खासदारच का जिंकून आले असते? नेहमीच या देशात कोणतीच मुस्लीम व्होट बँक नव्हती.” असंही खासदर ओवेसींनी जाहीरपणे सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या