महागाईचे चटके : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात दीडशे रूपयांची वाढ

दोन महिन्यात दुसऱ्यांदा वाढ

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत बुधवारपासून (12 फेब्रुवारी) वाढ करण्यात आली आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत सलग सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये अनुक्रमे १४४.५ आणि १४५ रुपये प्रति सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विना-अनुदानित सिलिंडर आता दिल्लीत ८५८.५ रुपये आणि मुंबईत ८२९.५ रुपये असे आहे, असं इंडियन ऑईल कॉर्पोरेशन म्हटलं आहे.


इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं डिसेंबर महिन्यात दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या शहरात अनुदानित एलपीजी गॅसवर २०० रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर दोन महिन्यांतच विना अनुदानित एलपीजी गॅसच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. साधारण प्रति सिलिंडर १४५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरकारकडून वर्षाला १२ एलपीजी गॅसवर अनुदान दिले जाते. मात्र अतिरिक्त सिलिंडरसाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागतात. नव्या वाढीमुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Increase in cooking gas cylinder rates by rs 150 abn

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या