पीटीआय, इस्लामाबाद

पाकिस्तान सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू होती. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे समर्थन असलेल्या अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतली असून ८६ जागांवर हे उमेदवार निवडणूक आले आहेत. नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाला ५९ तर झरदारी यांच्या पीपीपी या पक्षाला ४४ जागा मिळाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. एकूण ३३६ जागांपैकी २६५ नॅशनल असेंब्लीच्या जागांसाठी निवडणूक झाली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी १३३ जागांची आवश्यकता आहे. रात्री ९ पर्यंत २१३ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे समर्थन असलेल्या अपक्षांनी आघाडी घेतली असून एकूण ८६ जागांवर विजय मिळविला आहे.