गेल्या वर्षापासून लडाख सीमेजवळील सुरु असलेल्या चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भारताने कमीतकमी ५०,००० अतिरिक्त सैनिक सीमेवर तैनात केले आहे. गेल्या काही महिन्यांत चीनच्या सीमेजवळील तीन वेगवेगळ्या भागात भारताने सैन्य आणि फायटर विमाने तैनात करण्यात आली आहेत. सध्या चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण दोन लाखांच्या वर सैन्य सीमेवर तैनात करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, आता चीनच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे दोन लाख सैनिक तैनात करण्यात आलं आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत ४० टक्के जास्त आहे. मात्र  भारतीय लष्कराच्या आणि पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) प्रवक्त्यांनी यासंदर्भातील कोणतीही माहिती दिलेली नाही. यासोबत भारतीय हवाई दलाची विमानेही सीमेवर सज्ज करण्यात आली आहेत. ही लढाऊ विमाने चीनला लागून असलेल्या तीन भागांमध्ये तैनात आहेत.

चीनने लडाख सीमेवरून ९० टक्के सैनिकांना बोलावले माघारी; थंडीमुळे सैनिकांची प्रकृती खालावली

गलवान संघर्षानंतर भारताच्या धोरणात बदल

१९६२ मध्ये भारत आणि चीन यांच्यात दोन युद्धे झाली होती. १९७४ पासून काश्मिर हा दोन्ही देशांमधील अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याने भारताने धोरणात्मक दृष्टिकोनातून पाकिस्तानला अधिक महत्त्व दिले. गेल्या वर्षी १५ जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्याने भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबतचे प्रकरण शांत ठेवत चीनच्या सीमेवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

चीनविरूद्ध आक्रमक संरक्षण धोरण

यापूर्वीही सीमेवर चिनी अतिक्रमण रोखण्यासाठी भारताने सैन्य तैनात केले होते, पण आता सैन्यात वाढ करून आक्रमण रोखण्याची आणि चीनच्या सीमेत प्रवेश करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. भारत यापुढे चीनविरूद्ध आक्रमक संरक्षण धोरण अवलंबण्यास मागेपुढे पाहणार नाही असे सूत्रांनी म्हटले आहे.

लडाख सीमेवर चीनचा युद्धसराव; भारतची प्रत्येक हालचालींवर बारीक नजर

लडाख सीमेवर चीनचा युद्धसराव

जून २०२० मध्ये लडाखच्या गलवान व्हॅलीतील चिनी सैन्यासह झालेल्या संघर्षानंतर सीमेवर अद्याप शांतता नाही. दोन्ही देशांचे सैन्य अजूनही एकमेकांसमोर उभे आहेत. पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच चीनकडून कुरापती सुरुच आहे. चीनने पूर्व लडाखमधील सीमा भागात सैन्याच्या कारवाया वाढवल्या आहेत. या भागात चीनने युद्धसराव सुरु केला आहे. तरी, चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे. सीमेजवळील हवाई कारवायांबरोबरच चीनच्या युद्ध अभ्यावर लक्ष ठेवून आहे असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India aggressive sanctuary against china 50000 troops deployed at the border abn
First published on: 28-06-2021 at 13:15 IST