देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येने ७८ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या चोवीस तासांत ५०,१२९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजवर तब्बल ७० लाख करोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. भारतासाठी ही मोठी समाधानकारक बाब ठरली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात एकूण करोनाबाधितांची संख्या ७८,६४,८११ वर पोहोचली असून यांपैकी ६,६८,१५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ७०,७८,१२३ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत ६२,०७७ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही सर्वात खालच्या स्तरावर म्हणजेच १,४०,७०२ वर पोहोचली आहे. भारतात आजवर करोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या १,१८,५३४ इतकी असून ५७८ नव्या रुग्णांचा चोवीस तासांत मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण १,४०,७०२ अॅक्टिव्ह रुग्णांपैकी महाराष्ट्र अद्यापही रुग्णांची संख्या कायम आहे. आजवर महाराष्ट्रात १४,५५,१०७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर यांपैकी ४३,१५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, भारतानं या करोनाच्या संकटाशी सामना करताना रुग्ण बरे होण्याबाबतचं एक चांगलं ध्येय गाठलं आहे. देशात ७० लाख रुग्ण बरे होण्याचा हा विक्रम असून त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट हा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India has crossed landmark milestones in its fight against covid19 more than 70 lakh patients have been cured and discharged so far aau
First published on: 26-10-2020 at 09:02 IST