श्रीहरिकोटा : चांद्रमोहिमेच्या यशानंतर भारताची सूर्याभ्यास मोहीम आज, शनिवारपासून सुरू होत असून भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) ‘आदित्य एल१’ हे यान सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सूर्याकडे झेपावेल. त्याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे १२५ दिवसांचा असेल.

‘पीएसएलव्ही सी५७’ हा शक्तिशाली वाहक ‘आदित्य एल१’ यानाला घेऊन अंतराळात झेपावणार आहे. त्याची उलटगणती सुरू झाल्याचे ‘इस्रो’ने शुक्रवारी सांगितले. ‘आदित्य एल१’ला अचूक कक्षा (एल १ लॅग्रॅन्जिअन पॉईंट) गाठण्यासाठी १२५ दिवसांचा कालावधी लागेल, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विधिअग्राह्य विवाहातील संततीचाही पालकांच्या मालमत्तांवर अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटरवरील ‘एल१’ (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जिअन पॉइंट) येथील सौर वारे आणि सूर्याचे प्रभामंडल यांचे दूरस्थ निरीक्षण करण्यासाठी ‘आदित्य एल१’ची रचना करण्यात आली आहे. पृथ्वी आणि सूर्य यांचे गुरुत्वीय बल संतुलित राहतील असे पाच बिंदू (लॅग्रॅन्जिअन पॉइंट) आहेत. त्या बिंदूंवरून सूर्याचा अभ्यास करणे विशेष व महत्त्वाचे असते. त्यातील ‘एल १’ या बिंदूचा वापर ‘आदित्य एल १’ या मोहिमेत केला जाणार आहे. ‘एल१’बिंदूवरून सूर्याचे विनाअडथळा (ग्रहणाविना) निरीक्षण करण्याची मोठी संधी ‘आदित्य एल१’ला मिळणार आहे.

सूर्य हा सर्वात जवळचा तारा असल्यामुळे इतरांच्या तुलनेत त्याचा सखोल अभ्यास केला जाऊ शकतो, असे ‘इस्रो’ने या गुंतागुंतीच्या मोहिमेची माहिती देताना सांगितले. सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसेच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती मिळवता येईल, असेही ‘इस्रो’ने स्पष्ट केले.

हेही वाचा >>> त्रिशूळ संग्रहालयातून लष्करी पर्यटनाची मुहूर्तमेढ; भारत-चीन संघर्षांच्या इतिहासाची मांडणी, महाराष्ट्राचा पुढाकार, लेहमध्ये उद्या भूमीपूजन

सूर्यामुळे उद्रेकाच्या अनेक घटना घडतात. तो सौर मंडळामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करतो. अशा प्रकारच्या स्फोटक सौर घटना घडल्या तर पृथ्वीजवळच्या अवकाशात विविध प्रकारचे परिणाम संभवतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

सूर्याचा अभ्यास

’‘इस्रो’चा शक्तिशाली ‘पीएसएलव्ही सी५७’ वाहक मुख्य यानासह सात पेलोड्स घेऊन सूर्याकडे झेपावेल.

’सात पेलोड्सपैकी चार स्पेसक्राफ्ट सूर्याचे थेट निरीक्षण करतील, तर उर्वरित तीन पेलोड्स ‘एल१’ (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जिअन पॉइंट) बिंदू येथील कणांचा, तेथील क्षेत्राचा अभ्यास करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’या मोहिमेद्वारे सूर्याचे प्रकाश क्षेत्र, सूर्याच्या बाहेरील थर, सूर्याचे प्रभामंडल, सूर्याचे तापमान, अतिनील किरणे, ओझोनवरील परिणाम आदी घटकांचा अभ्यास.