भारतात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७ लाख ४ हजार इतकी झाली आहे. तर आतापर्यंतची एकूण मृतसंख्या २० हजार ६४२ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतात सध्या करोनाचे २ लाख ६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात एक लाख लोकसंख्येमागे करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात हे प्रमाण १४.२७ असून जगभरातील सरासरी प्रमाण ६८.२९ इतके आहे. देशभरात एकूण २० हजार १६० मृत्यू झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ६ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, इराण, मेक्सिको, ब्राझील, पेरू, अमेरिका, फ्रान्स, इटली, स्पेन आणि ब्रिटन या देशांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे १३७, २३५, ३०२, ३१५, ३९१, ४५६, ५७६, ६०७ आणि ६५१ मृत्यू झाले आहेत. भारतात एक लाखामागे ५०५ करोनाबाधित आहेत तर, जगभरात लाखामागे सरासरी १४५३ व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. हे प्रमाण चिलीमध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे १५,४५९, पेरूमध्ये ९,०७० तर अमेरिका, ब्राझील, स्पेन, रशिया, ब्रिटन, इटली, मेक्सिको या देशांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे ८५६०, ७४१९, ५३५८, ४७१४, ४२०४, ३९९६ आणि १९५५ इतके लोक करोना बाधित झाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India records 22752 new cases in 24 hours death toll climbs to 20642 sgy
First published on: 08-07-2020 at 10:11 IST