किमती कमी करण्यासाठी भारताने अमेरिका, जपान आणि इतर प्रमुख अर्थव्यवस्थांसोबत आपल्या आपत्कालीन साठ्यातून सुमारे ५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा खुला करण्याची योजना आखली आहे, असे एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. भारत पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील तीन ठिकाणी भूगर्भातील गुहेत सुमारे 38 दशलक्ष बॅरल कच्चे तेल साठवतो.

यापैकी,७-१० दिवसांच्या सुरूवातीस सुमारे ५ दशलक्ष बॅरल साठा खुला केला जाईल, असं नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले.हा साठा मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांना विकला जाईल जे धोरणात्मक साठ्यांशी पाइपलाइनने जोडलेले आहेत.

देशभरातल्या विविध भागांमध्ये सध्या पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे जनसामान्यांची चिंता मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. अशात इलेक्ट्रिक वाहनांच्या पर्यायाबद्दलही चर्चा केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या पर्यायाचा विचार करण्याची तयारी दर्शवली आहे. सरकारलाही पेट्रोल-डिझेलला पर्याय ठरणाऱ्या इंधनांचा वापर वाढवायचा आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या पर्यायाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात…

“सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब करण्याच्या बाजूने आहे. याशिवाय इथेनॉल, बायो-एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापरही सरकारला वाढवायचा आहे.”, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. “ज्वलनशील इंधनावर चालणाऱ्या वाहनांची नोंदणी थांबवणार नाही. मला वाटते की आम्हाला काहीही अनिवार्य करण्याची गरज नाही.”, असंही ते म्हणाले.