अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या भेटीच्या वेळी जे निर्णय घेण्यात आले त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याबाबतच्या चर्चेबरोबरच अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांचे येथे आगमन झाले.
पुढील वर्षी अफगाणिस्तानातून नाटो सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने निर्माण होणारी स्थिती आणि बांगलादेश, इराण आणि सीरियातील स्थिती या बाबत सुजाता सिंग अमेरिकेतील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहेत.
ओबामा आणि डॉ. सिंग यांनी सप्टेंबर महिन्यात झालेल्या चर्चेच्या वेळी जे निर्णय घेतले त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने पुढाकार घेतला असून ही अंमलबजावणी कशी करावयाची त्यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.भारतात पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्या वेळी उभय देशांमधील संबंधात कोणतीही बाधा येऊ द्यावयाची नाही, असे ओबामा आणि डॉ. सिंग यांच्या बैठकीत ठरले.