भारतविरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीने संथ खेळी केल्याची टिका नेटकऱ्यांनी केली आहे. बांगलादेशसमोर मोठे आव्हान उभे करण्याची संधी असताना धोनी आणि दिनेश कार्तिकने संथ खेळी करत भारताच्या डावाला मिळालेली गती कमी केल्याने भारताला ३१४ धावांपर्यंतच मजल मारता आल्याची खंत नेटकऱ्यांनी ट्विटवरुन व्यक्त केली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यामध्ये भारताने ३१४ धावांपर्यंत मजल मारली आहे. बांगलादेशसमोर ३१५ धावांचे लक्ष्य भारताने ठेवले आहे. सलमीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली. सामन्याच्या २९ व्या षटकामध्ये १८० धावांना भारताची पहिली विकेट पडली. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी झटपट धावा करण्याच प्रयत्न केला. या दोघांनाही मैदानामध्ये पाय रोवल्यानंतर मोठी खेळी करता आली नाही. कोहली आणि पांड्या एकामागोमाग एक बाद झाल्यानंतर ३८ व्या षटकात धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यावेळी भारताची धावसंख्या २३७ इतकी होती. एकीकडे ऋषभ पंतने ४८ धावांची खेळी केली तर दुसरीकडे धोनीने शेवटच्या षटकांपर्यंत वाट पाहण्याचे धोरण अवलंबल्याचे चित्र दिसत होते. मात्र शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात तो ३५ धावांवर झेलबाद झाला. ३५ धावा करण्यासाठी त्याने ३३ चेंडू घेतले. यावरुनच नेटकरी संतापले असून इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही धोनी आणि केदार जाधवने जिंकण्यासाठी खेळत नव्हते असचं त्यांचा खेळ पाहून वाटतं होते अशी टिकाही झाली होती. अशाचप्रकारची टिका आजही धोनीवर करण्यात आली. ट्विटरवर धोनीची अनेकांनी मस्करी केली.

१)
भुवनेश्वरला बॅटिंग द्यायची ना

२)
धोनी बाद झाल्याचा सर्वाधिक आनंद

३)
तो धोनी असता तर

४)
पंत आणि धोनी

५)
भारतीय चहाते

६)
संजय मांजरेकर आणि धोनी कॉम्बीनेशन

७)
धोनीचंच टेन्शन जास्त

८)
असलं काही आपण करत नसतो

९)
त्यांचे स्ट्राइक रेट बघा

१०)
तेव्हा धोनी कसा होता

११)
फरक

१२)
कसोटी चाहत्यांची

१३)
बॉल धोनीला काय म्हणतो

१४)
विराट धोनीची फलंदाजी पाहून

१५)
के एल राहुल म्हणतोय…

दरम्यान, मागील काही सामन्यांमध्ये धोनीच्या संथ फलंदाजीवरुन त्याच्या टिका होताना दिसत आहे. धोनीमुळे इतर फलंदाजांवर दबाव येत असल्याची टिकाही नेटकऱ्यांनी अनेकदा केली आहे.