India will apologize, US Commerce Secretary Howard Lutnick’s statement: अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी शुक्रवारी म्हटले की, त्यांना अपेक्षा आहे की भारत पुढील एक किंवा दोन महिन्यांत पुन्हा व्यापार वाटाघाटीसाठीच्या येईल आणि व्यापार करारावर स्वाक्षरी “माफी मागेल”, कारण अमेरिका हा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे आणि “ग्राहक नेहमीच बरोबर असतो”.

“मला वाटते, हो, एक-दोन महिन्यांतच भारत चर्चेच्या टेबलावर असेल. ते माफी मागतील आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करार करण्याचा प्रयत्न करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कसे वागायचे हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात असेल”, असे लुटनिक यांनी ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

…तर मग ५० टक्के टॅरिफ भरा

लुटनिक म्हणाले की, “भारताला त्यांची बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली करायची नाही, रशियाकडून खरेदी थांबवायची नाही आणि ब्रिक्स गटातूनही बाहेर पडायचे नाही. भारत रशिया आणि चीनमधील एक स्वर आहे. जर त्यांना तेच व्हायचे असेल तर व्हा. पण एकतर डॉलरला पाठिंबा द्या, अमेरिकेला पाठिंबा द्या, तुमचा सर्वात मोठा क्लायंट, जो अमेरिकन ग्राहक आहे, त्याला पाठिंबा द्या, किंवा मला वाटते की, मग तुम्ही ५० टक्के टॅरिफ भरा.”

भारताने ठरवावे

लुटनिक म्हणाले की “अमेरिका चर्चेस तयार आहे”, परंतु अमेरिका हा जगातील सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

“भारताला कोणत्या बाजूला राहायचे आहे हे, त्यांनी ठरवावे लागेल. मजेदार गोष्ट म्हणजे, आपण चीन आणि भारत या दोन्ही देशांची ग्राहक बाजारपेठ आहोत. त्यामुळे ते दोन्ही देश एकमेकांच्या देशात विक्री करू शकणार नाहीत. आपण जगाचे ग्राहक आहोत. लोकांनी हे लक्षात ठेवावे की, आपली ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था जगाची ग्राहक आहे. म्हणून शेवटी त्या सर्वांना ग्राहकांकडे परत यावे लागेल, कारण आपल्याला सर्वांना माहित आहे की, शेवटी ग्राहक नेहमीच बरोबर असतो”, असे लुटनिक म्हणाले.

कॅनडाचे उदाहरण

लुटनिक शेवटी म्हणाले की, “तुम्ही कॅनडाबरोबर काय झाले हे पाहिले. त्यांनी प्रत्युत्तरात्मक टॅरिफ लादले. ते धाडसी होते. आणि काय झाले? त्यांचा जीडीपी उणे १.६ टक्के, बेरोजगारी ८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी काय केले? त्यांनी अखेर त्यांचे प्रत्युत्तरात्मक टॅरिफ मागे घेतले.”