अमेरिकेत भारतीय वंशाचा विद्यार्थी समीर कामत याचा मृतदेह आढळला आहे. २३ वर्षांच्या समीर कामतचा मृतदेह एका अभयारण्यात मिळाला. त्यानंतर वॉरेन काऊंटी पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. २०२४ हे वर्ष सुरु झाल्यापासून ही भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही सातवी घटना आहे.

फर्स्टपोस्टच्या बातमीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास निशेज लँड ट्रस्टच्या अभयारण्यात समीर कामत या २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. मागच्या दोन आठवड्यांतली ही चौथी घटना आहे. समीर कामतचा मृतदेह आम्हाला सोमवारी संध्याकाळी ५ वाजता मिळाला असं पोलिसांनी सांगितलं आहे. समीर कामतच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसंच लोकांनी या घटनांमुळे घाबरुन जाऊ नये असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे.

समीर कामत कोण होता?

समीर कामत हा भारतीय वंशाचा अमेरिकन नागरिक होता. मॅसेचुसेट्समध्ये तो राहात होता. तर Purdue विद्यापीठातून तो मॅकेनिकल इंजिनिअरींग या विषयात डॉक्टरेट करत होता. मॅसेचुसेट्स विद्यापीठातून त्याने मॅकेनिकल इंजिनिअर ही पदवी घेतली होती. ऑगस्ट २०२३ मध्ये त्याने मास्टर्सही पूर्ण केलं. त्यानंतर तो डॉक्टरेट होण्यासाठी शिकत होता. त्याच्या मृत्यूबाबत एक पत्रक काढण्यात आलं आहे. ज्यामध्ये समीर कामतच्या डोक्यात गोळी झाडली गेल्याची जखम आहे आणि आत्महत्या केल्याने त्याचा मृत्यू झाला असा उल्लेख आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- अमेरिकेत शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्यानं काय केलं पाहा; सोशल मीडियावर VIDEO ची तुफान चर्चा

अमेरिकेत होणाऱ्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूंबाबत भारत सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले होते की अमेरिकेचं सरकार अमेरिकेत असलेल्या इथल्या विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क सुरु करणार आहे. हैदराबादच्या सय्यद मजहर अलीवर शिकागोमध्ये हल्ला झाला. त्यानंतर श्रेयस रेड्डी या विद्यार्थ्यावर ओहायो मध्ये हल्ला झाला. या गोष्टी चिंता वाढवणाऱ्या आहेत असंही रेड्डी म्हणाले होते. तसंच केंद्र सरकारने त्यांना मदत करावी आम्ही साथ देऊ असंही रेड्डी म्हणाले.