नवी दिल्ली : Indian Army Chopper Crash in Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशच्या मंडला डोंगराळ भागाजवळ भारतीय सैन्याचे चिता हेलिकॉप्टर कोसळले. वैमानिकाला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. सैन्य अधिकाऱ्यांकडून अपघातासंदर्भात अधिक माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चित्ता हेलिकॉप्टरचा आज सकाळी नऊ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास एटीसीशी संपर्क तुटला, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी दिली. बोमडिला मॅन्डला वेस्टजवळ या चिता हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे.

अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळील ऑपरेशनल सॉर्टी (जेव्हा सैनिकांच्या एका गटाला एका विशिष्ट मिशनवर पाठविले जाते, तेव्हा त्याला ऑपरेशन सॉर्टी म्हणतात) राबवण्यात आले आहे. ऑपरेशन सॉर्टीअंतर्गत एक लढाऊ वैमानिक टार्गेटवर बॉम्ब टाकून परततो, खरं तर तो एक मिशनचा भाग असतो. चिता हेलिकॉप्टरच्या पायलटचा आज सकाळी ०९: १५ च्या सुमारास एटीसीशी संपर्क तुटल्याची नोंद आहे.

बोमडिला मॅन्डला वेस्टजवळ हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेशमधील पोलिसांनी सांगितले की, सैन्याचे हेलिकॉप्टर हवेत असताना त्यांचा संपर्क तुटला आणि मिसामारीकडे जाणाऱ्या रस्ते मार्गातही ते सापडलं नाही. दुपारी १२.३० वाजता बंगजालेप, दिरांग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावकऱ्यांनी हेलिकॉप्टर पाहिल्याचं सांगितलं.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल