Viral Video Dublin Ireland Bus: आयर्लंडच्या डब्लिनमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक स्थानिक तरुण बस प्रवासादरम्यान एका भारतीय मुलाला मारहाण करताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पीडित मुलाच्या पालक त्याच्या शेजारीच बसल्या होत्या, परंतु त्यांनी यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही. उलट, काहीही न करता त्या तेथून निघून गेल्या. गेल्या आठवड्यात डब्लिनमध्ये अशाच प्रकारच्या आणखी एका वांशिक हल्ल्याची घटना उघडकीस आली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, वाढता वांशिक द्वेष आणि शारीरिक हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

काय आहे घटना?

डब्लिनमध्ये बस प्रवासादरम्यान एका स्थानिक तरुणाने एका भारतीय मुलाला विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आयर्लंडमधील हा तरुण एका मुलावर जीवघेणा हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसते. यामध्ये आश्चर्य असे की, पीडित भारतीय मुलगा आणि त्याच्या पालक या हल्ल्याचा कोणत्याही प्रकारे प्रतिकार न करता शांत बसल्याचे दिसत आहे. शेवटी, हल्लेखोराने पीडित मुलाच्या चेहऱ्यावर जोरदार मारहाण करण्यास सुरुवात केली, तेव्हा मुलगा त्याच्या पालकासह घटनास्थळावरून निघून गेले.

दरम्यान, ‘एक्स’वर एका युजरने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओबरोबर शेअर केलेल्या पोस्टमध्ये युजर म्हणाली की, “एका निष्पाप, तरुण, सावळ्या रंगाच्या मुलाला मास्क घातलेल्या एका गुंड प्रवृत्तीच्या तरुणाकडून उघडपणे मारहाण होत आहे. ही घटना अत्यंत संतापजनक आहे. या मारहाणीमुळे पीडित मुलाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या महिलेसोबत गपचूप निघून जावं लागलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्या वेळी उपस्थित कोणताही प्रवासी किंवा व्यक्ती त्यांच्या मदतीस धावून आली नाही.”

काही दिवसांपूर्वी डब्लिनमध्ये एका भारतीयावर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. यामध्ये काही तरुणांनी एका भारतीय पुरुषावर क्रूर हल्ला करत त्याचे कपडे फाटेपर्यंत मारहाण केली होती. स्थानिक रहिवासी जेनिफर मरे यांनी पीडित पुरुषाला वाचवले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेसबुकवर शेअर केलेल्या भावनिक व्हिडिओमध्ये मरे यांनी म्हटले होते की, “फक्त ही एकच घटना नाही. आरोपी टोळीने अलिकडच्या काळात किमान चार इतर भारतीयांना लक्ष्य केले आहे.”