कोळसा खाण वाटप घोटाळ्यातील सर्व प्रकरणांची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्रीय दक्षता आयोगाचे सहकार्य मागितले. या प्रकरणी तपास अधिकारी आणि सीबीआयचे मुख्यालय यामध्ये आरोपपत्र दाखल करण्यावरून मतभिन्नता आहे.
सदर प्रकरणे बंद करणे उचित आहे की सीबीआयने आरोपपत्र दाखल करणे गरजेचे आहे या बाबत मुख्य दक्षता आयुक्त आणि दोन दक्षता आयुक्तांनी आपले म्हणणे मांडावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता असतानाही सीबीआयने दोन प्रकरणांच्या फायली बंद करण्याचा अहवाल दिला, अशी माहिती देण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सदर आदेश दिला.