Indian Family Accident अमेरिकेत सुट्टीसाठी गेलेल्या हैदराबादच्या कुटुंबाचा अंत झाला आहे. अमेरिकेत अपघाताच्या दोन घटना घडल्या ज्याममध्ये सहा भारतीयांचा मृत्यू झाला. त्यापैकी एका घटनेत एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले. हैदराबाद या ठिकाणी राहणारं कुटुंब सुट्टीसाठी अमेरिकेला गेलं होतं. त्यावेळी ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. यानंतर या कारने पेट घेतला आणि या घटनेत आई, वडील, मुलगा आणि मुलगी या चौघांचा मृत्यू झाला. दुसरी घटना न्यूयॉर्कची आहे. या घटनेत दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

हैदराबादमधल्या एकाच कुटुंबातील चारही जणांचा अंत

हैदराबादचे डॉक्टर व्यंकट, त्यांची पत्नी तेजस्विनी तसंच त्यांचा एक मुलगा आणि मुलगी चौघंही अपघातात ठार झाले आहेत. अमेरिकेत सुट्टीसाठी गेलेल्या या कुटुंबाच्या कारला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की चौघं जण ज्या करामध्ये बसले होते त्या कारने पेट घेतला. आपल्या नातेवाईकांना भेटून हे चौघं अटलांटाहून परतत होते त्यावेळी या चौघांच्या कारला ट्रकने धडक दिली. ट्रकची टक्कर भयंकर होती त्यामुळे कारला आग लागली. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होते आहे. भारतीय दुतावासाच्या मदतीने हे मृतदेह लवकरच आणले जातील आणि भारतातल्या हैदराबादमध्ये त्यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले जातील. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमका या कुटुंबाचा अपघात कसा झाला?

एक मिनी ट्रक ग्रीन कंट्री भागात या कुटुंबाच्या कारला धडकला. ज्यानंतर कारने पेट घेतला आणि या अपघातात चारही जणांचा मृत्यू झाला. चौघंही पेटत्या कारमध्ये होरपळले आणि त्यांचा मृत्यू झाला. अमेरिकेला सुट्टी साजरी करण्यासाठी हे कुटुंब आलं होतं, त्यांची ही सुट्टी शेवटचीच ठरली. या ठिकाणी पोलीसही दाखल झाले. दरम्यान कार जळून खाक झाली आहे. या ठिकाणी असलेली मृतदेहांची हाडंच भारतात पाठवण्यात येतील. त्याआधी ती फॉरेन्सिक चाचणीसाठीही पाठवण्यात आली आहेत.