भारतीय नौदलाने अरबी समुद्रात मोठी कारवाई करत इराणच्या जहाजाला समुद्री चाच्यांच्या तावडीतून यशस्वीरित्या सोडविले आहे. भारतीय नौदलाने शुक्रवारी उशिरा याबाबत माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे या जहाजावर २३ पाकिस्तानी नागरिक होते. या नागरिकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने १२ तासांचे ऑपरेशन राबवले.

हेही वाचा – पाकिस्तानातील १५०० वर्षे जुने श्री पंचमुखी हनुमानाचे मंदिर तुम्हाला माहितीये का?…

pm narendra modi bill gates
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”
electoral bonds and supreme court
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी सरकारने १० हजार कोटींचे निवडणूक रोखे छापण्यास मंजुरी दिली
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
Supreme court Justince Bhushan Gavai
“सरकार आणि कार्यकारी मंडळ अपयशी ठरत असताना…”, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मोठे विधान

नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गुरुवारी संध्याकाळी समुद्री चाच्यांनी इराणच्या मासमारी करणाऱ्या अल कंबार ७८६ या जहाजाचे अपहरण केल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय नौदलाने आयएनएस सुमेध आणि आयएनएस त्रिशूल या दोन युद्धनौका त्या जहाजाच्या दिशेने वळवल्या. या दोन्ही युद्धनौका अरबी समुद्रात सागरी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आल्या होत्या.

 indian navy rescue
फोटो सौजन्य – भारतीय नौदल

दरम्यान, शुक्रवारी सकाळी आयएनएस सुमेधने अल कंबार ७८६ जहाजाला सोकोत्राच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे ९० नॉटीकल माईलवर रोखले. काही वेळातच आयएनएस त्रिशूल देखील या ठिकाणी दाखल झाले. अखेर १२ तासांचे ऑपरेशन राबवल्यानंतर समुद्री चाच्यांनी भारतीय नौदलाकडे आत्महसमर्पण केले. तसेच या बोटीवरील २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात आली.