Indian Origin Doctor Shot in US: भारतीय वंशाचे ६३ वर्षीय डॉक्टर रमेश बाबू पेरामशेट्टी यांची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यातील रमेश बाबू पेरामशेट्टी हे अमेरिकेतील एक नावाजलेले डॉक्टर होते. शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी अॅलाबामामधील टस्कलोसा भागात त्यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेतील वेगवेगळ्या भागांत असणाऱ्या रुग्णालयांचं व्यवस्थापन ते पाहात होते.

डॉक्टर रमेश बाबू पेरामशेट्टी हे क्रिम्सन नेटवर्कसाठी काम करणाऱ्या स्थानिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे ते संस्थापक सदस्य व वैद्यकीय संचालक होते. क्रिम्सन ग्रुप हा अमेरिकेत विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांचं व्यवस्थापन करतो. रमेश बाबू पेरामशेट्टी यांच्या निधनानंतर क्रिम्सन ग्रुपकडून सोशल मीडियावर निवेदन जारी करण्यात आलं असून त्यामध्ये पेरामशेट्टी यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, डॉ. रमेश बाबू पेरामशेट्टी यांच्या हत्येबाबत संशय व्यक्त केला जात असून त्याबाबत स्थानिक पोलीस तपास करत आहेत. त्यांच्या हत्येची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटानं स्वीकारलेली नाही. मात्र, स्थानिक सूत्र व प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने पोलीस पुढील तपास करत आहेत.

आर्थिक अनियमिततेप्रकरणी ‘सीबीआय’चा तपास; कोलकाता हत्या प्रकरणात आरोपींच्या मालमत्तांचीही झडती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत डॉ. रमेश बाबू पेरामशेट्टी?

रमेश बाबू पेरामशेट्टी यांना ३८ वर्षांचा वैद्यकीय सेवेचा अनुभव आहे. ते टस्कलोसा भागात काम करत होते. काही स्थानिकांच्या मते टस्कलोसामधील काही भागाला त्यांचं नावही देण्यात आलं होतं, अशी माहिती एनडीटीव्हीनं दिली आहे. रमेश बाबू पेरामशेट्टी यांनी कोविडच्या काळातही मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा केली होती. त्यांना त्यासाठी पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं होतं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे कुटुंबीय अमेरिकेतच वास्तव्यास आहेत.