Hydrogen Train In India : सध्या डिझेल वापरानंतर इलेक्ट्रिककडे वळलेली भारतीय रेल्वे आता पुन्हा एकदा नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी सज्ज झाली आहे. रेल्वे मंत्रालय लवकरच भारतात हायड्रोजनवर चालणारी रेल्वे सुरू करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे ही हायड्रोजन ट्रेन मार्च २०३१ मध्ये भारतामध्ये धावण्याची शक्यता आहे.

२८०० कोटी रुपये निधी मंजूर

भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तयार केली जात आहे. हायड्रोजन इंधन ट्रेनचे अनेक फायदे मिळणार आहेत. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे ग्रीन ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी वापरून शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल असणार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये रेल्वे मंत्रालयाने ३५ हायड्रोजन फ्युअल सेल आधारित रेल्वे विकसित करण्यासाठी २८०० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन सेट या (मार्च) महिन्यात तयार होणे अपेक्षित आहे. जानेवारी महिन्यात आसीईचे जनरल मॅनेजर यू. सुब्बा राव म्हणाले होते की, “आम्ही प्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून हायड्रोन प्युअल सेल ट्रेन सेटवर काम करत आहोत. हायड्रोजन फ्युअल सेल कोच निर्मितीचे काम आसीएफ येथे सुरू आहे. मार्च २०२५ मध्ये हा ट्रेन सेट तयार होणे अपेक्षित आहे.”

भारताची मोठी भरारी

भारताने अलिकडेच जगातील सर्वाधिक क्षमतेचे हायड्रोजनवर चालणारे ट्रेन इंजिन विकसित केले आहे. बहुतांश देशांनी ५०० ते ६०० हॉर्सपॉवर (एचपी) क्षमतेच्या हायड्रोजन ट्रेन तयार केल्या आहेत, तर भारताने १,२०० हॉर्सपॉवर (एचपी) क्षमतेचे इंजिन तयार करून मोठे यश मिळवले आहे.

पहिली हायड्रोजन ट्रेन कुठे धावणार?

भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागाला देण्यात आली आहे. तसेच ही रेल्वे ८९ किमी लांबीच्या जिंद-सोनीपत विभागात धावण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.