हैदराबादच्या एका अभियंत्याची बुधवारी रात्री अमेरिकेतील कान्सस शहरातील एका बारमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार, हल्लेखोराने गोळी झाडण्यापूर्वी गेट आऊट ऑफ माय कंट्री (माझ्या देशातून चालता हो) असे ओरडत होता. या घटनेत आणखी एक भारतीय जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोराला अटक करण्यात आली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अभियंत्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृत भारतीय अभियंत्याचे नाव श्रीनिवास कुचिभोतला (वय ३२) आहे. त्याच्या जखमी सहकाऱ्याचे नाव आलोक मदासनी आहे. आरोपीची ओळख पटली असून अॅडम प्यूरिंटन (वय ५१) असे त्याचे नाव आहे. प्यूरिंटन हा अमेरिकन नौदलाचा माजी कर्मचारी आहे. ही घटना बुधवारी सांयकाळी ७.१५ च्या सुमारास घडली. या वेळी प्यूरिंटन नशेत होता. तो वारंवार वाशिंक टिप्पणी करत होता. बारमधील एका कर्मचाऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता माझ्या देशातून चालता हो, असे म्हणत त्याने श्रीनिवास आणि त्याच्या मित्रावर गोळ्या झाडल्या.
मृत श्रीनिवास हा मुळचा हैदराबादचा होता. तो अमेरिकेतील एका एव्हिएशन कंपनीत कामाला होता. त्याने २००५ मध्ये जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठातून इलेक्ट्रिकलमधून अभियंत्याची पदवी तर टेक्सास अल पासो विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian shot dead at a bar in kansas in us
First published on: 24-02-2017 at 09:13 IST