indigo flight caught in Delhi dust storm watch video : दिल्लीला जात असलेल्या एका इंडिगोच्या एका विमानाला धुळीच्या वादळामुळे मध्येच लँडिंग थांबवावे लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट क्रमांक 6E 6313 हे विमान रायपूर येथून दिल्लीकडे जात होते. विमान जेव्हा दिल्ली विमानतळावर उतरणार होते तेव्हा वातावरण अचानक बिघडले. हवेचा वेग ८० किलोमिटर प्रति तास इतका झाला, ज्यामुळे वैमानिकाला अखेरच्या क्षणी लँडिंग रद्द करावे लागले.
यादरम्यान हे विमान काही काळ हवेतच होते आणि नंतर हवामान थोडे ठीक झाल्यानंतर ते दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. पायलटने प्रवाशांना सांगितले की जोराच्या हवेमुळे त्याने लँडिंग रद्द केले आणि सुरक्षित उंचीवर पोहोचून हवामान सुधारण्याची वाट पाहिली.
इंडिगोचे हे विमान त्याच्या ठरलेल्यावेळेत रायपूरहून दिल्लीला रवाना झाले होते. मात्र जेव्हा हे विमान दिल्ली विमानतळावर लँड करणार होते तेव्हा अचानक वातावरण बिघडले. दिल्लीत जोराचे धुळीचे वादळ सुरू झाले, ज्यामुळे रनवेवरील दृश्यमानता खूपच कमी झाली. जेव्हा विमान जमीनीपासून काही मीटर उंचीवर होते आणि लँडिंगची तयारी केली जात होती तेव्हा अचानक वैमानिकाने प्रवाशांना हवामान बिघडल्याचे सांगितले ज्यामुळे वैमानिकाने पुन्हा उड्डाण करण्याचा निर्णय घेतला.
#WATCH | An IndiGo flight number 6E 6313 from Raipur to Delhi experienced turbulence due to a duststorm, prompting the pilot to climb up again when the aircraft was about to touch down at Delhi airport. The aircraft landed safely at Delhi airport after making many circuits in the… pic.twitter.com/TtDUwIH79b
— ANI (@ANI) June 1, 2025
दरम्यान या विमानातून रेकॉर्ड केलेला एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. हे विमान धुळीच्या वादळात आडकल्यानंतर विमानातील प्रवाशांची स्थिती काय होती ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा लँडिंगचा न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हवेत अनेक फेऱ्या मारल्यानंतर विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.