माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम त्यांच्या जन्मस्थळी करावा आणि गांधी-नेहरू घराण्यातील एका सदस्याला अलाहाबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व द्यावे, अशी विनंती काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.
रायबरेली या आपल्या लोकसभा मतदारसंघाचा दोन दिवसांचा दौरा करून शुक्रवारी सायंकाळी सोनिया गांधी येथे एका खासगी कामानिमित्त आल्या होत्या. त्या वेळी स्थानिक नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना वरील विनंती केली.
पक्षाचे आमदार अनुराग नारायण सिंह आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल द्विवेदी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष कार्यकर्त्यांनी स्वराज भवन येथे सोनिया गांधी यांची शनिवारी सकाळी भेट घेतली.
तथापि, आपण खासगी दौऱ्यावर आलो असल्याने या वेळी कोणताही संदेश देणार नसल्याचे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2016 रोजी प्रकाशित
इंदिरा गांधी जन्मशताब्दी त्यांच्या जन्मस्थळीच करण्याची विनंती
पक्ष कार्यकर्त्यांनी स्वराज भवन येथे सोनिया गांधी यांची शनिवारी सकाळी भेट घेतली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 14-02-2016 at 01:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indira gandhi birth centenary congress party