Hyderabad Surrogacy Racket Infant bought for Rs 90000 sold as IVF baby for Rs 35 lakh : हैदराबाद येथे सरोगसीच्या नावावर लहान मुलांची खरेदी-विक्री केल्याचे एक अत्यंत धक्कादायक रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणात आता अनेक नवीन खुलासे होताना दिसत आहेत. सिंकदराबाद येथील फर्टिलिटी क्लिनिकशी संबंधित या प्रकरणात, २०२४ मध्ये आयव्हीएफ उपचारांसाठी आलेल्या जोडप्याला एका गरिब कुटुंबाकडून विकत घेण्यात आलेलं अर्भक देण्यात आल्याची बाब पोलिसांना आढळून आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, रुग्णालयाने या जोडप्याला आधी तर सरोगसीचा पर्याय निवडणाचा सल्ला दिला आणि त्यांना हे बाळ बायोलॉजिकली त्यांचेच असेल असेही पटवून दिले. या जोडप्याकडून या प्रक्रियेसाठी रुग्णालयाने ३५ लाख रुपये वसूल केले.
रविवारी या प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी आठ जणांना अटक केले आहे. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून युनिव्हर्सल स्रृष्टी फर्टिलिटी सेंटरचे डॉक्टर अथलुरी नम्रता (६४) , डॉ. नारगुला सदानंदम (४१) आणि गांधी हॉस्पिटल या सरकारी रुग्णालातील अनेस्थेटिस्ट याच्याबरोबरच एजंट्स आणि टेक्निशियन्स याचा समावेश आहे.
सरोगसी प्रक्रियेच्या नावावर ग्राहकांची फसवणूक करणे आणि लहान मुलांची खरेदी-विक्री करणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. पोलिसांना असेही आढळून आले की सेंटरचा परवानाही २०२१ मध्ये रद्द करण्यात आला होता. डॉ. नम्रता यांच्याकडून हे बेकायदेशीरपणे चालवले जात होते.
अजून प्रकरणे असू शकतात
“उघड झालेले प्रकरण फक्त हिमनगाचं टोक असल्याचं दिसून येत आहे; अशी अनेक प्रकरणे असू शकतात. याचा शोध घेण्यासाठी आम्ही या फटर्निटी सेंटरच्या वेगवेगळ्या शाखांमधून सरोगसी आणि आयव्हीएफ उपाचार घेणाऱ्या इतर जोडप्यांची चौकशी करत आहोत,” असे डीसीपी (उत्तर विभाग) एस रश्मी पेरिमल यांनी सांगितले.
यापूर्वी २०१६ आणि २०२० अशा दोन वेळा या डॉक्टर नम्रता या चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या होत्या. पहिल्या प्रकरणात एका अमेरिकेतील एनआरआय जोडप्याने त्यांना कथितपणे सरोगसीच्या माध्यमातून देण्यात आलेले बाळ हे बायोलॉजिकली त्यांच्याशी संबंधित नसल्याचा आरोप केला होता, यावेळी तेलंगणा मेडिकल कौन्सिलने या डॉक्टरेचा परवाना पाच वर्षांसाठी रद्द केला होता. त्यानंतर २०२० मध्ये नवजात बालकांची तस्करी केल्याच्या आरोपाखाली डॉ. नम्रता आणि इतर ५ जणांना अटक केली होती.
पोलिसांनी सांगितले की आरोपी डॉक्टर आणि तिच्या विशाखापट्टनम, हैदराबाद आणि गुंटुर येथील दवाखाण्यांवर यापूर्वी १० गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने यासंबंधिचे वृत्त दिले आहे.
प्रकरण कसे उघड झाले?
हे ताजे प्रकरण जेव्हा उघडकीस आली जेव्हा २६ जुलै रोजी गोपालपुरम पोलीस ठाण्यात एका शहरातील जोडप्याने तक्रार केली. या जोडप्यान सृष्टी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर नावाने ओळखल्या जाणाऱ्या रुग्णालयाने त्यांना जे बाळ दिलं ते बायोलॉजिकली वडीलांशी संबंधित नसल्यावरून पोलीस ठाणे गाठले. त्यांनी हे तपासण्यासाठी स्वतंत्र्यपणे डीएनए टेस्ट करून पाहिली. या जोडप्याने सरोगसी उपचारांसाठी ३५ लाख रुपये दिल्याचे सांगितले जात आहे.
मुख्य आरोपीची चौकशी केली असता हे सरोगसीचे प्रकरण नसल्याचे आढळून आले. डॉ. नम्रता आणि तिचे कर्मचारी अपत्य नसलेल्या जोडप्यांना गरीब गर्भवती महिलांना पैशांचे आमिष दाखवून विकत घेतलेली आणि नवाजात मुले विकत होती, असे डीसीपी म्हणाले.
२६ जुलै रोजी शहरातील एका जोडप्याने गोपालपुरम पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा ही ताजी घटना उघडकीस आली. त्यांनी असा आरोप केला की व्यावसायिक सरोगसीद्वारे क्लिनिक – ज्याला सृष्टी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर म्हणून ओळखले जाते – ने त्यांना दिलेले बाळ वडिलांशी जैविकदृष्ट्या संबंधित नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वतंत्रपणे डीएनए चाचणी केली होती. या जोडप्याने या प्रक्रियेसाठी ३५ लाख रुपये दिल्याचा आरोप आहे.
अटक करण्यात आळेले बाळाचे बायॉलॉजिकल आई-वडील हे मुळचे आसामचे आहेत आणि ते हैदराबादमध्ये राहातात. त्यांना ९०,००० रुपये देणअयात आले होते आणि बाळंतपणासाठी आईला विशाखापट्टनम येथे पाठवण्यात आले होते, असेही डीसीपींनी सांगितले. बाळ जेव्हा विकण्यात आलं तेव्हा ते फक्त दोन दिलसांचं होतं.