scorecardresearch

महागाईच्या चटक्यांनी पोळला पाकिस्तान! कांदा ३५० रुपये किलो, एक किलो पीठाची किंमत १६० रुपये

पाकिस्तानमधील महागाई आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. बहुतांश लोकांसाठी पीठ खरेदी करणं देखील अवघड झालं आहे.

Inflation in Pakistan
पाकिस्तानमधील महागाई आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. बहुतांश लोकांसाठी पीठ खरेदी करणं देखील अवघड झालं आहे.

पाकिस्तानमधील महागाई आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. बहुतांश लोकांसाठी पीठ खरेदी करणं देखील अवघड झालं आहे. पाकिस्तानमधील पीठ महागल्यामुळे भाकरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसऱ्या बाजुला तेल आणि भाज्यांच्या किंमती देखील काडाडल्या आहेत. हे कमी होतं म्हणून की काय पाकिस्तानात आता कांदा आणि मीठ देखील महाग झालं आहे. कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

पाकिस्तानातलं शाहबाज सरकार महागाई नियंत्रणात आण्यात अपयशी ठरत आहे. याआधीचं इम्रान खान सरकार देखील महागाईवर कोणताही उपाय करू शकलं नव्हतं. पाकिस्तानमधील परिस्थिती आता श्रीलंकेसारखी होऊ लागली आहे.

महागाईने कंबरडं मोडलं

पाकिस्तानमध्ये महागाईचा दर २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये महागाईचा दर १२.३ टक्के इतका होता. तर पाकिस्तानमधल्या खाद्य पदार्थांच्या किंमती ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

हे ही वाचा >> भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभासाठी २१ पक्षांना आमंत्रण, तृणमूलसह हे ९ पक्ष येणार नाहीत, कारण काय?

पेट्रोल-डिझेल भडकलं

भारतात पेट्रोलचा दर ९६ रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर ९० रुपये प्रति लीटर इतका आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये पेट्रोल २५० रुपये प्रति लीटर तर डिझेल २६० रुपये प्रति लीटर या दराने विकलं जात आहे. केरोसिनची किंमत १९० रुपये प्रति लीटर इतकी आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचं अवमूल्यन होत असल्याने समस्या वाढत आहेत.

चपाती-रोटी महागली

पाकिस्तानमध्ये गव्हाची मोठी टंचाई आहे. अनेक शहरांमध्ये पीठ मिळणं अवघड झालं आहे. गव्हाच्या पीठाची किंमत ३० ते ४० रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. भारतात गव्हाच्या पिठाची किंमत ३० ते ४० रुपये प्रति किलो इतकी आहे. तर पाकिस्तानात एक किलो गव्हाच्या पिठासाठी १४५ ते १६५ रुपये मोजावे लागत आहेत.

हे हे वाचा >> राहुल गांधींनी लाल चौकात फडकवला तिरंगा, अशी कामगिरी करणारे ठरले दुसरे काँग्रेस नेते

तांदूळ आणि साखरही महागली

भारतात तांदळाची किंमत ३५ ते ४० रुपये प्रति किलो इतकी आहे. तर पाकिस्तानात १ किलो तांदळासाठी २०० ते २२० रुपये मोजावे लागत आहेत. भारतात साखरेची किंमत ४० ते ४८ रुपये प्रति किलो इतकी आहे. पाकिस्तानात हीच किंमत ९० ते १२० रुपये इतकी आहे. तेल आणि डालड्याची किंमत भारतात सरासरी १६० ते १८० रुपये प्रति लीटर इतकी आहे. तर पाकिस्तानात यासाठी ५७० ते ६५० रुपये प्रति लीटर इतके पैसे मोजावे लागत आहे.

कांद्याने रडवलं

भारतात कांद्याचा दर ३० रुपये प्रति किलो इतका आहे. तर पाकिस्तानात कांद्याची किंमत २२० ते २५० रुपये इतकी आहे. भारतीय रुपयात याची तुलना करायची झाल्यास कांद्यासाठी तिथे ७० ते ८० रुपये मोजावे लागत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 18:15 IST