भारतात तयार झालेल्या कफ सिरपमुळे आफ्रिकेच्या गांबियामध्ये ६६ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. ही घटना देशासाठी लज्जास्पद असल्याचे ‘इन्फोसिस’चे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. यामुळे देशातील औषध नियामक एजन्सीच्या विश्वासाहर्तेला धक्का बसला आहे, असेही मूर्ती म्हणाले आहेत. ‘इन्फोसिस सायन्स फाऊंडेशन’तर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात एक लाख डॉलर्सच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

नारायण मूर्तींचा कानमंत्र ठरला टर्निंग पॉइंट, ऋषी सुनक यांनी सांगितला पंतप्रधानपदापर्यंत पोहचण्याचा प्रवास

“करोना लस निर्मितीसह लसीकरणात देशात चांगली कामगिरी झाली आहे. मात्र, तरीही विज्ञान संशोधन क्षेत्रात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे”, असे मूर्ती यांनी यावेळी सांगितले. एक अब्ज कोविड लशींचे उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे कौतुक करताना हे एक मोठे यश आहे, असेही मूर्ती यांनी म्हटले आहे. प्राध्यापक कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींवर आधारित नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचंही मूर्ती यांनी यावेळी कौतुक केलं.

Russia Ukraine War : रशियाकडून पोलंडवर क्षेपणास्त्र हल्ला? जो बायडेन यांनी बोलावली तातडीची बैठक

लहान वयातच कुतुहल निर्माण न झाल्यामुळे समस्या सोडवण्यासाठी संशोधनाच्या उपयोगात भारत अकार्यक्षम ठरत आहे, असे तज्ज्ञांचे मत असल्याचे मूर्ती यांनी यावेळी सांगितले. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये अपुऱ्या अत्याधुनिक संशोधन पायाभूत सुविधा, अपुरे अनुदान आणि संशोधनासाठी प्रोत्साहन निर्माण करण्यात होणारा अवाजवी विलंब, यामुळे संशोधन क्षेत्रात भारताची पिछेहाट होत असल्याचे मूर्ती यावेळी म्हणाले.

वसईतील तरुणीच्या हत्या प्रकरणाला नवे वळण; मला घेऊन जा, अथवा ही माझी शेवटची रात्र..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नाविन्यपूर्ण संशोधनातील यशासाठी केवळ पैसाच प्राथमिक स्रोत असू शकत नाही. आर्थिक आणि सामाजिक आघाडीवर देशाची प्रगती वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधनाच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे,” असेही मूर्ती यांनी यावेळी म्हटले आहे.