Crime News : उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे काही दिवसांपूर्वी पत्नीने प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या तुरूंगात आहेत. यादरम्यान एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने तुरूंगात असलेल्या या आरोपी महिलेबरोबर गणवेशातील पोलिस निरीक्षक नाचतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. एआय वापरून तयार केलेला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर या प्रकरणी मेरठ पोलिसांनी या इन्स्टाग्राम वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हा व्हिडीओ फेसबूक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये पती सौरभ राजपूत याची तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने हत्या करणारी आरोपी मुस्कान रस्तोगी (२६) हिला दाखवण्यात आले होते.

मेरठ (शहर)चे एसपी आयुष विक्रम सिंह यांनी सांगितले की, व्हिडीओ एआय वापरून बनवण्यात आला होता आणि पोलिसांनी ही व्हिडीओ सोशम मीडियावर अपलोड केला गेला त्या आयडीचा शोध घेतला. उर निरीक्षक कर्मवीर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणात शनिवारी संध्याकाळी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

“इंस्टाग्राम आयडी प्रियांशु रॉक्स या नावाने रजिस्टर केलेली आहे, ज्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (कॉम्प्युटरशी संबंधित गुन्हे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी मेरठ पोलिसांच्या सायबर सेलकडे सोपवण्यात आली आहे,” असे विक्रम सिंह यांनी सांगितले.

हा व्हिडीओ वाईट उद्देशाने अपलोड करण्यात आला आहे आणि यामुळे यूपी पोलिसांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचू शकतो. म्हणून आम्ही अशा कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

दरम्यान सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला हे आता मेरठमधील चौधरी चरण सिंग तुरूंगात आहेत. त्यांच्यावर ३ मार्चच्या रात्री ब्रह्मपुरी परिसरातील तिच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये सौरभ शुक्ला याची हत्या करून त्याचे शरीराचे तुकडे केल्याचा आरोप आहे. नंतर पोलिसांनी त्याच्या शरीराचे तुकडे सिमेंटच्या ड्रममधून जप्त केले होते. या प्रकरणी या दोघांना १९ मार्च रोजी अटक करण्यात आळी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हत्या झालेल्या सौरभच्या कुटुंबियांनी उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्‍यांच्या पोर्टलवर तक्रार दाखल केली असून त्यांनी आरोप केला आहे की मेरठ तुरुंग प्रशासन पक्षपाती आहे आणि तुरुंगात त्याच्या मारेकऱ्यांना संरक्षण देत आहे. तसेच त्यांनी दोन्ही आरोपींनी पूर्वेकडील तुरुंगात हलवण्याची मागणी केली आहे.