आयएनएक्स मीडिया प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने पी चिदंबरम यांना दिल्लीमधील जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली. पी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. मात्र पी चिदंबरम बेपत्ता होते. अखेर २७ तासांनंतर पी चिदंबरम समोर आले आणि काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यानंतर सीबीआय त्यांना अटक करण्यासाठी काँग्रेस कार्यालयात दाखल झाली होती. पण पी चिदंबरम घरी रवाना झाल्याने सीबीआयदेखील तिथे पोहोचलं आणि अटकेची कारवाई केली. मात्र यावेळी पी चिदंबरम यांच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
#UPDATE CBI Sources: P Chidambaram has been arrested on an arrest warrant issued by a competent court. https://t.co/hpshBAAlEO
— ANI (@ANI) August 21, 2019
गेट उघडला जात नसल्याने सीबीआयला घरात प्रवेश करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

अखेर ३० तासांनंतर पी चिदंबरम यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दिल्ली पोलिस उपायुक्त आणि सहआयुक्त पी चिदंबरम यांच्या घरी दाखल झाले आहेत. ईडी आणि सीबीआयची टीम आधीच निवासस्थानी हजर आहे.
ईडीची एक टीम चिदंबरम यांच्या निवासस्थानावरुन रवाना झाली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराला सील करण्यास सुरुवात केली आहे.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने सीबीआयचे मुख्य संचालक चिदंबरम यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
चिदंबरम यांच्या घराबाहेर समर्थकांचा जोरदार गोंधळ सुरु असून पोलीस त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.